आता किंवा भविष्यात कोणत्या गोष्टी आजिबात करायच्या नाहीत, हे लक्षात घेण्यासाठी आपल्या भूतकाळाचा विचार, करायला शिकूयात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
शहाणपणा:
इतरांच्या अज्ञानावर हसणे व त्यांचा गैरफायदा घेणे म्हणजे मूर्खपणा, त्यांना अज्ञानावर मात करायचा मार्ग दाखवणे म्हणजे शहाणपणा.
नकार:
आपल्या मागणीला नकार आल्यास अजून अनुभव घेऊया, तज्ञांकडून नवीन कौशल्य शिकूया, थोडी वाट बघूया आणि पुन्हा मागणी करूया.
विनंती:
आपल्यावर अन्याय झालाय अस वाटल्यास, नम्रपणे, व्यावहारिक पद्धतीने व सभ्य भाषेत ते दुरूस्त करण्याची विनंती करायला शिकूया.
नकार:
आपल्याला नकार ऐकण्याची भीती वाटत असेल तर, जास्त वेळा मागत राहूया, नकार ऐकूया, हळूहळू पचवायला शिकूया.
गुरूकिल्ली:
आपण सध्या करीत असलेले आपले काम आणखी चांगले करून दाखवणे, हीच आपल्या प्रगतीची व विकासाची गुरूकिल्ली आहे.
मदत मागायला:
आपल्या खराब कामगिरीचे व कमी गुणांचे समर्थन करत बसण्याऐवजी, कामगिरी व गुण सुधारण्यासाठी तज्ञांची मदत मागायला शिकूया.
मोकळ्या मनाचे:
आपल्या मनातले आधीपासूनचे किंवा सध्याचे सगळे गैरसमज व कुरबुरी प्रामाणिकपणे मिटवून टाकून, मोकळ्या मनाचे व्हायला शिकूया.
पुढाकार:
वादाच्या व भांडणाच्या प्रसंगी समोरच्याने माफी मागण्याची वाट न बघता, आपण अगोदर माफी मागून, पुढाकार घ्यायला शिकूया.
क्षमा:
“त्याची चूक आहे त्याने क्षमा मागावी” या दुबळ्या व्रुत्तीपेक्षा आपण “अगोदर क्षमा मागायला शिकूया” आणि सबळ होऊया.