भांडणे मतभेदांमुळे होत नाहीत तर मतं, भावना व द्रुष्टीकोन अनास्थेने धुडकावून लावल्यामुळे किंवा पायदळी तुडवल्यामुळे होत असतात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
खरा मित्र:
आपल्या अस्वस्थ भावना, स्पष्टीकरण न देता आपल्या कोनातून समजून घेतो, त्यांना हलक्यात घेऊन उडवून लावत नाही, तोच खरा मित्र.
प्राथमिक मानसिक गरजा:
स्वीकार, आदर, विश्वास, कौतुक, प्रोत्साहन, क्रुतज्ञता, सामंजस्य व क्षमा या आपल्या प्राथमिक मानसिक गरजा असतात.
भावनिक गरजा:
जर आपल्या भावनिक गरजा भागवल्या तर, परस्परविरोधी कल्पना, भावना आणि इच्छा-आकांक्षा आपण सहज हाताळू शकतो.
वेदना सहन करत:
आपण जेव्हा भावनिक पातळीवर वेदना सहन करत असतो, तेव्हा इतरांबरोबर आदराने व प्रेमळपणे वागणे, जरासे कठीण असू शकते.
अस्वस्थ झाल्यावर:
अस्वस्थ झाल्यावर त्या वातावरणापासून दूर जाणे, थोडा वेळ एकटे रहाणे, वादाची सुरुवात ओळखणे आणि पुन्हा समंजसपणे व आदरपूर्वक संवाद साधणे योग्य.
गरज:
वादविवाद करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते, तर तो टाळण्यासाठी व मिटवण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीची गरज असते.
दुखावतात:
आपण तावातावाने मांडलेल्या गुणात्मक व तार्किक मुद्यांपेक्षा, आपल्या चेहऱ्यावरील रागीट भाव व हावभाव, समोरच्याला दुखावतात.
शब्द:
वादविवादांमध्ये बोलताना काळजीचे, काळजाचे, आदराचे व दिलासा देणारे शब्द वापरून बोलायला शिकूया.
जाणीव:
मतभेदांबाबत बोलताना आपण काय बोलतोय त्यापेक्षा आपण ते कशा प्रकारे बोलतोय, याची जाणीव ठेवायला शिकूया.