आपले अंतःकरणातील चित्रपट व संवाद, आपल्या ध्येयांशी व उद्दीष्टांशी मिळतेजुळते असल्याची, क्षणोक्षणी खात्री करून घेऊयात.
Category: Uncategorized
कल्पना:
कल्पनाच करायची आहे तर, जीवनात आरोग्य, सुसंवाद, सुख, आनंद, प्रेम, श्रद्धा आणि सद्भावना असल्याची करूयात.
साखळदंड:
आपल्याला बांधून ठेवणारे साखळदंड, म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपलेच पूर्वग्रह, धारणा, मते, समज आणि पूर्वकल्पना होत.
नकार:
आपल्या स्वतःच्या खोट्या खोट्या, दाटूक मूटूक, आभासी व दिखाऊ अशा चित्रपट विश्वाला व जगण्याला आपण नकार दिला पाहिजे.
गायब:
एका अप्रिय घटनेबरोबर चिंता, ताण, असुरक्षा या नकारात्मक भावना उद्भवतात, घटना स्वीकारताच, या सर्व भावना गायब होतात.
पहायला:
स्वतःच्या जीवनातील कडूगोड वास्तवाबाबत, त्रस्थपणे पहायचे कमी करून, त्रयस्थपणे पहायला सुरूवात करूयात.
“वाढ”दिवस:
चांगभलं म्हणत, प्राधान्यकर्मे करत व अकलेला खतपाणी घालत घालवलेला प्रत्येक दिवस आपला “वाढ”दिवस ठरेल.
मनामध्ये:
दैनंदिन जीवनातील कामे करताना आपण आपल्या मनामध्ये दयार्द्रता, करूणा, सौजन्य व भलेपणा या भावनांची जपणूक करूया.
आधारे:
स्वातंत्र्य व प्रेम यांच्या आधारे, दैनंदिन जीवनातील छोटे मोठे निर्णय घेतल्यास, आपण नवीन जीवनप्रवास विकसित करू शकतो.
स्मरण:
स्वतःसाठी काही सूचना, संकेत व सूत्रे निश्चित करून, त्यांचे मनातल्या मनात किंवा प्रत्यक्ष स्मरण करत रहाणे, आपण शिकूया.