पहिल्यांदा केल्याच पाहिजेत अशा गोष्टींची व कामांची आखणी व अंमलबजावणी पहिल्यांदा करायला शिकून इतर गोष्टी वाटायला किंवा नाकारायला शिकूया.
Category: Uncategorized
नाही:
आपल्याला लगेचच “लोकप्रिय” करणाऱ्या आणि आपली तात्पुरती “सुटका” करणाऱ्या सुखदायक, रोमहर्षक व मनोरंजक पर्यायांना “नाही” म्हणायला शिकूया.
सवयी:
आपल्या नैसर्गिक वृत्ती व सवयी ह्या आपल्या इच्छा, आवडी, संगत, शिस्त, वाटणे व ठरवणे यांमधून येत नाहीत, तर मनातील धारणा व द्रुष्टीकोन यांमधून येतात हे समजून घ्यायला शिकूया.
ब्रीदवाक्य:
कशाकशाला “होय” म्हणावं व कशाकशाला “नाही”? हे ऐनवेळी समजण्यासाठी योग्य तत्वांचं व ध्येयांचं एक “वैयक्तिक ब्रीदवाक्य” आपण स्वतःसाठी बनवायला शिकूया.
अडथळा:
आपल्याला “चांगलं, उत्तम व सर्वोत्तम वाटण्याच्या” मार्गातला खूप मोठा अडथळा असतो “आपलं बरं चाललंय” असं वाटणं, हे समजून घ्यायला शिकूया.
होय:
आपल्या मनामध्ये जर एका गोष्टीला “होय” असेल, तर बाकीच्या गोष्टींना आपण “नाही” म्हणू शकतो तेही वाईट वाटून न घेता व क्षमायाचना न करता.
कष्ट:
तंदुरुस्त व निरोगी शरीरासाठी आपल्याला अन्न गरजेचे आहेच, पण त्याहुनही जास्त गरजेचे काय असेल? तर ते आहे; हातापायाला व मेंदूला गरजेपुरते कष्ट व काम.
यश:
यश म्हणजे आपल्यासाठी जे खरोखर महत्त्वाचे आहे, ते स्वतः पुढाकार घेऊन शोधणे आणि ते प्रामाणिकपणे, सचोटीने, प्राधान्याने व अथकपणे करायला शिकणे.
कोण:
आपण आपले ध्यान कुठे केंद्रीत करावे? व कशाचे अतिरिक्त ज्ञान मिळवावे? हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम आपण कोण आहोत? याचे भान असायला हवे.
जीवनमूल्ये:
आपली जीवनमूल्ये व व्यवहारमूल्ये ही पकडापकडीच्या खेळातील भोंग्यासारखी असतात, त्यांचा स्पर्श झाल्यावर आपल्यावर कोणीही राज्य आणू शकत नाही.