बदल:

आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कष्ट करणे व साधनसंपत्ती कमावणे यांबरोबरच आपल्या मनातल्या चुकीच्या धारणा, द्रुष्टीकोन व गृहितके यांवरही काम करूयात.

वर्णन:

जगातील घटना, वस्तू आणि गोष्टी यांचं आपण स्वतः केलेलं वर्णन हे आपल्या स्वतःच्या पूर्वग्रहांचं, आकलन क्षमतेचं, धारणांचं, भावार्थाचं व गृहितकांचं वर्णन असतं.

अस्तित्व:

आपल्या दाटूकमूटूक, खोट्या व दिखाऊ बोलण्याने व वागण्याने आपलं मूळ अस्तित्व झाकलं जात नाही, आपल्या वास्तविक जीवनात व आपल्या स्वभावात ते व्यक्त होतंच.

बदल:

आपल्या स्वतःमध्ये, नातेसंबंधांमध्ये व परिस्थितीमध्येही बदल घडवायचा असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या मनातील समज, दृष्टिकोन व हेतू बदलणे.

वेळ:

आपण कीतीही बीझी असलो तरीही, आपल्या आयुष्यात संतुलन साधण्यासाठी सर्वोच्च प्रधान्य आपण कशाला द्यावे? या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यासाठी निवांत वेळ काढायला शिकूया.

नष्ट:

स्वतःला “बळीचा बकरा, परिस्थितीचं प्यादं, कोणाच्या हातचं बाहुलं किंवा दुर्दैवाचं फळ” समजणं, म्हणजे आशावाद व इच्छाशक्ती आपल्या मनातून नष्ट करणे.

नम्रता:

नम्रता म्हणजे आपल्या सद्य परिस्थितीचा विनाअट स्वीकार करणे आणि त्या परिस्थितीला कारणीभूत असल्याबद्दल आपला स्वतःच्या जबाबदारीचा भाग स्वीकारणे.

काम:

आपलं आजच्या घडीचं अर्जंट व डोक्यावर बसलेलं काम व भविष्यातील उज्ज्वल यशासाठी गरजेचं महत्वाचं व अंतःकरणातील काम, या दोघांमध्ये संतुलन करायला शिकूयात.

फॉलो:

महान व यशस्वी व्यक्तीला फॉलो करण्याऐवजी, ती व्यक्ती ज्या गहन व शाश्वत तत्वांना व मूल्यांना फॉलो करते त्यांना आपणही फॉलो करूया, आपणही यशस्वी होऊया.