ज्या गोष्टी आपल्याला थकवून टाकतात, निस्तेज व निरूत्साही किंवा शक्तीहीन व क्षीण बनवतात त्या आपले ध्येय म्हणून नाकारायला शिकूया.
Category: Uncategorized
द्रुष्टीकोन:
जी माहिती आपले स्वतःचे स्वतःविषयीचे व इतरांविषयीचे द्रुष्टीकोन उजळ करते ती वारंवार वाचायला व ऐकायला शिकूयात.
प्रतिभाशाली:
प्रतिभाशाली होण्याची पहिली पायरी म्हणजे फायदा, यश किंवा जगण्याचा आनंद मिळवून देणाऱ्या नवकल्पना सुचणे व सुचवणे.
खूश:
स्वतःला खूश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःबद्दलचा अभिमान व आदर तयार होईल किंवा वाढत जाईल अशा गोष्टी व कामे करणे.
सच्चे मित्र:
मनावर चांगला प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी-किस्से व शुभवार्ता सांगणारे आणि प्रोत्साहनपर शब्द बोलणारे सच्चे मित्र सकारात्मक जीवन जगण्यासाठी गरजेचे आहेत.
ध्येय:
‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ हे त्या क्षणापुरते ठीक म्हणूया, पुढच्याच क्षणी अंथरूण वाढवण्याचे ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे ठीक मानूया.
काम:
आपली शारिरीक, मानसिक व आत्मीक मनःस्थिती उत्तम ठेवण्याचा, उत्तम मार्ग म्हणजे, करण्यासारखे काहीतरी काम शोधणे.
शिक्षण:
शिक्षण म्हणजे आपल्या स्वतःतल्या सुप्त क्षमतांची व गुणांची ओळख करून घेण्यासाठी उपयुक्त प्रयोगांची तोंडओळख करून घेणे.
अपराधाची भावना:
आपल्या स्वप्रतिमेला व दैनंदिन कामगीरीला बाधा करणारी, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील; अपराधाची भावना.
आरोग्य:
आपले दूषित विचार शुद्ध करणे आणि कडवट द्रुष्टीकोन व व्रुत्ती गोड बनवणे, म्हणजे आपले आरोग्य व जीवन सुधारणे, यात शंकाच नाही.