एखाद्या क्षेत्रात हमखास यशस्वी व्हायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच क्षेत्रातील सर्वांत यशस्वी व्यक्तीचा सल्ला व मार्गदर्शन मागणे.
Category: Uncategorized
सुसंवाद:
सुसंवादांमध्ये समोरच्या व्यक्तीचे मूल्यमापन, मूल्यांकन व न्यायनिवाडा या गोष्टींना थारा नसतो, हे समजून घ्यायला शिकूयात.
मनोधैर्य:
जी बातमी आपले मनोधैर्य उंचावत नाही, तिकडे साफ दुर्लक्ष करूयात आणि आपली सद्सदविवेकी व संवेदनशील बुद्धी वाचवूयात.
जागरूक:
आपण जागरूक असल्यास बहुतेक अफवा, गावगप्पा व आतल्या गोटातील भानगडी या “अर्धसत्य किंवा थापा”, असल्याचे जाणवते.
अभाव:
शत्रुत्वाचे मुख्य कारण विरोधी विचार नसून आदरयुक्त शब्द, न्याय्य वागणूक व मनापासूनचे कौतुक, गौरव व प्रोत्साहन यांचा अभाव हे आहे.
प्रभावी:
“बदला किंवा सूड घेणे” या प्रकारापेक्षा “स्वतःला बदलणे किंवा स्वतःची सोडवणूक करून घेणे” हे प्रकार जास्त प्रभावी व सुखदायक आहेत.
समस्या:
लोकांना त्यांना स्वतःला पडलेल्या समस्यांचे निराकरण करून हवे असते, आपल्याला ज्या लोकांच्या समस्या वाटतात त्यांचे नव्हे.
कौतुक:
इतरांनी काय करायला व घ्यायला पाहिजे? याचा विचार करायचे सोडून, त्यांनी जे केले व घेतले आहे, त्याचे कौतुक करायला शिकूयात.
आवड:
समोरच्या व्यक्तीच्या आवडीचा विषय ऐकल्याने व बोलल्याने नवीन गोष्टी कळतात, नेहमी स्वतःला आवड असणाऱ्या विषयावर बोलून नव्हे.