संबंध कडवट व्हायला फार मोठी भांडणे नव्हे, तर महिनोंमहिने व वर्षानुवर्षे वारंवार घडणारी छोटी छोटी पण दुर्लक्षित कारणे लागतात.
Category: Uncategorized
आठवूया:
उत्सुकता, अभिमान, आशा, निर्धार, इच्छा अशा सकारात्मक भावना निर्माण करणारे, आपल्या आयुष्यातील लहानमोठे प्रसंग सदैव आठवूया.
ध्यास:
आपण ज्या कामाचा ध्यास घेतलेला असतो, ते काम आपण जीव तोडून व मन मोडून करतो, त्याबद्दल भारावून व उत्साहाने बोलतो.
सुरुवात:
कोणत्याही बदलाची सुरुवात “स्वतःपासून” सुरू करते ती “आशा”, तर बदलाची सुरूवात “इतरांपासून” सुरू करते ती “अपेक्षा”.
अर्थ:
“काय घडतंय” यांपेक्षा त्या घडलेल्या गोष्टींचा “आपण काय अर्थ लावतोय”, यावरच आपल्या प्रतिक्रिया ठरत असतात.
समजून:
“माझा असा समज झाला”, असं नंतर म्हणण्यापेक्षा अगोदरच प्रश्न विचारून व उत्तरे नीट ऐकून विषय पूर्ण समजून घेतलेला बरा.
प्रतिक्रिया:
प्रतिक्रिया देताना “बरोबर किंवा चूक” अशी देण्याऐवजी “मला योग्य वाटते किंवा वाटत नाही कारण की..” अशी द्यायला शिकूयात.
प्रत्युत्तर:
संभाषणात जे ठरावीक शब्द आपल्याला प्रत्युत्तर द्यायचा विचार करायला भाग पाडतात, ते शोधून व त्यांना ओळखून; पुन्हा ऐकायला शिकूया.
शिकणे बंद:
मला कल्पना आहे, मला माहिती आहे, हा आता बोर मारणार, नेहमीची बडबड व टीका करणार असे समजल्यास; आपण शिकणे बंद करतो.
ऐकून घेणे:
“ऐकून घेणे” म्हणजे भावना, विचार, द्रुष्टीकोन व कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न करणे; सहमत होणे किंवा स्वीकार करणे नव्हे.