रागावलेल्या मनःस्थितीत, कसलीही क्रुती न करता, प्रथम आपला राग कसा जाईल? याचा विचार करायला शिकूयात.
Category: Uncategorized
उजळणी:
एखादे काम आपण कधी, कोठे, कसे करणार व ते तसे घडल्यास आपल्याला कसे वाटणार, याची तपशीलवार उजळणी अगोदर करायला शिकूया.
जाग्रुत:
जाग्रुत होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिवसभरातील घटनांमागील भावना, विचार, कारणमिमांसा व पर्याय शांतक्षणी लिहून काढणे.
अस्वस्थ:
आपण अस्वस्थ होतो ते आपल्या परिस्थितीमुळे नव्हे, तर त्याकडे पाहण्याच्या आपल्या अविवेकी, अवास्तव व तर्कदुष्ट दृष्टिकोनामुळे.
खूप लक्ष:
जेव्हा एका गोष्टीकडे आपण खूप लक्ष देऊन मेहनत करतो, तेव्हा दुसऱ्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होऊन ती आपण सोडून देत असतो.
जाणीव:
आपण कशा स्थितीत बसलो आहोत, याकडे लक्ष दिल्यावर किंवा त्याची फक्त जाणीव झाल्यावर, आपली बसण्याची स्थिती सुधारेल.
समतोल:
नातेसंबंधांमध्ये जुळवून घेताना, आपली जवळीक साधण्याची इच्छा व स्वतंत्र असण्याची इच्छा यांचा समतोल राखायला शिकूयात.
उच्च अपेक्षा:
इतरांकडून सतत उच्च अपेक्षा ठेवून त्या पूर्ण न झाल्यास दोषारोप करण्यापेक्षा, आपल्याच उच्च अपेक्षा थोड्या कमी करायला शिकूयात.
चांगले:
लोकांशी वागताना व बोलताना त्यांच्यामध्ये चांगले काय आहे, ते शोधूयात व त्याबाबतच विचार करायला शिकूयात.
अर्थ:
इतरांच्या वागण्याचा अर्थ काढण्याची व अनुमान लावण्याची सवय, तापदायक ठरल्यास, फक्त ते वागणं पाहून, पुढे जायला शिकायला हवे.