आपल्यातील उणीवा, आपली हानी किंवा तोटा यांबद्दल वाटणारा तिटकारा, आपल्या मनात जन्मजात असतो, हे समजून घेऊयात.
Category: Uncategorized
समाधानकारक:
“नाइलाज आहे, केलेच पाहिजे, करावे लागले” यांपेक्षा “करावेसे वाटले, स्वेच्छेने केले, मर्जीने केले, स्वतः ठरवले” हे जास्त समाधानकारक.
इच्छाआकांक्षा:
हितकारक मार्गावरून चालताना, व्यावहारिक लाभांच्या इच्छांपेक्षा आंतरिक समाधान देणाऱ्या इच्छाआकांक्षा, सतत समोर ठेवायला शिकूया.
अवमूल्यन:
“शिक्षण असेल तर नोकरी, नोकरी असेल तर छोकरी,” ही विचारधारा शिक्षण, नोकरी, माणूस व माणूसकी यांचे अवमूल्यन करणारा ठरतो.
अभ्यास:
मुलांनी अभ्यास करावा यासाठी, विषयांबद्दल गोडी, आवड, उत्सुकता व कुतूहल निर्माण होईल असे काही, त्यांच्यासमोर ठेवायला हवे.
लक्ष:
आव्हाने पेलताना धनाबरोबरच, आपले ज्ञान व अनुभव वाढणार, विचारकक्षा रूंदावणार, तनमन विकसित होणार त्यांवरही लक्ष देऊया.
ध्येय:
आत्मविकास, आत्मानंद आणि आत्मशांती यांच्या प्राप्तीचे ध्येय समोर ठेवणे, आपल्याला जास्त प्रेरणादायी व सुखदायी ठरते.
कोरल्या:
ज्या वस्तुस्थिती व घटना आपण वारंवार आठवत व उजळत राहतो, त्या आपल्या दिर्घकालीन स्म्रुतीत खोल कोरल्या जातात.
क्रुतीस्म्रुती:
खेळातील आपले कौशल्य हे लहान मेंदूतील क्रुतीस्म्रुतीवर अबलंबून असते म्हणून जास्त विचार केल्यास त्यावर विपरीत परिणाम होतो.
बक्षीस:
आपल्यासाठी सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे काहीतरी नवे शिकण्याच्या व करण्याच्या प्रक्रियेतून मिळणारे समाधान व खुशी.