आपल्याला जीवनात काय साध्य करायचे आहे? हे माहीत असेल, तर आपल्या मान्यता, क्षमता, संधी, योग्य इत्यादी ठरवणे सोपे.
Category: Uncategorized
स्वतःवर रागावणे:
आपल्याला येणाऱ्या राग, द्वेष, निराशा यांबद्दल स्वतःवर रागावणे किंवा अपराधी वाटणे म्हणजे स्वतःच्या जखमेवर, स्वतःच मीठ चोळणे.
मार्ग:
आपल्याला हवं ते मिळवताना, आजूबाजूची परिस्थिती न बिघडवणारा व जवळची माणसे न दुखावणारा, मार्ग निवडायला शिकूया.
बिनसलंय:
‘आपलंच काहीतरी हरवलंय व बिनसलंय,’ असं वाटत असताना, आपण इतरांना मदत करण्याची व समजून घेण्याची शक्यता कमीच.
अर्थ:
‘आपण एक जबाबदार व बांधिलकी जपणारी व्यक्ती असून इतरांना आपली गरज आहे,’ असे वाटण्याने, आपल्या जगण्याला अर्थ येतो.
स्वप्नांचा अंत:
आपल्या स्वप्नांचा अंत अपयशामुळे होत नाही, तर त्याबाबत औदासिन्य, काहीही न शिकणे, तटस्थपणा, तपशील न विसरणे यांमुळे होतो.
कारण:
समर्पण व भक्तीभाव या भावनांनी आयुष्य जगण्याच्या नादात, स्वतःच्या इच्छा व गरजांकडे दुर्लक्ष करणे, आपल्या दुःखाचे कारण ठरते.
यश:
आपल्याजवळ सर्व सुखसुविधा, पैसाअडका, जमीनजुमला, गाडीबंगला, मुलंबाळं असूनही आपण आनंदी असणं, हेच खरं वैयक्तिक यश.
स्वार्थी:
इतरांच्या भावनांची व गरजांची पर्वा न करणे आणि त्यांच्या भल्या बुऱ्याचा विचार न करणे, म्हणजे स्वार्थी बनणे.
केंद्रस्थानी:
आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी, भौतिक सुखाची मागणी ठेवण्याऐवजी प्रेम, आनंद, बळ व शांती यांची मागणी ठेवायला शिकूया.