आपल्याजवळ काय नाही? का नाही? व ते कसे मिळवायचे? या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायला सुरुवात करूयात.
Category: Uncategorized
उद्देश:
जर आपल्याला भविष्यातील आपला उद्देश नक्की करायचा असेल तर, आज आपण कुठे, कसे व का आहोत? हे शोधणे महत्त्वाचे आहे.
जिंकणे:
वैयक्तिक पातळीवर जिंकणे म्हणजे आपण पडल्यावर किंवा हरल्यावर, परत उठून उभे राहणे व पुन्हा प्रयत्न करणे
द्रुष्टीकोन:
इतरांच्या द्रुष्टीकोनातून, आपण आपल्या परिस्थितीकडे पहायला शिकल्यावर, आपले द्रुष्टीकोन विशाल व प्रगल्भ होत जातात.
प्रवास:
“मला कोणी समजून घेत नाही” ते “मला समजून घेतले जावे” ते “मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे” हा प्रवास म्हणजे वैयक्तिक विकास.
समजून घेणे:
व्यक्तीला समजून घेणे म्हणजे तिच्या जागी आपण असतो तर? अशी कल्पना करणे व तिच्या नजरेतून वास्तव स्थितीकडे पाहता येणे.
स्वीकार:
आपल्या व इतरांच्या भावनांचं मूल्यांकन करण्याऐवजी स्वीकार करणे, आपल्याला परिवर्तनासाठी प्रेरणा व शक्ती देणारे ठरू शकते.
तेच व तसेच:
जेव्हा आपल्या भावना दुखावल्या जातात व आपल्याबद्दल अपशब्द बोलले जातात, तेव्हा आपण तेच व तसेच करायचे टाळायला शिकूया.
प्रशंसा:
इतरांबाबत टीका करणे, दोष देणे किंवा अवमूल्यन करणे यांऐवजी, प्रशंसा करण्याची संधी शोधायला शिकूया.
पारतंत्र्य:
आपल्याला जसे वाटते तसे इतरांनाही वाटावे व आपण जसे विचार व कार्य करतो तसेच इतरांनीही करावे, ही इच्छा म्हणजे पारतंत्र्य.