नकारात्मक अभिप्रायाबद्दल आक्रमक किंवा बचावात्मक होण्याऐवजी; अभ्यासू, शिकाऊ व क्रुतज्ञतेची भूमिका फायद्याची.
Category: Uncategorized
आभास:
कालची चिंता व उद्याची भीती यांमुळे आपले आजचे जीवन सत्य व वास्तव न राहता आभास व विस्तव बनायला लागते.
उत्तर:
“विचार करणे” हे जगातील सर्वात अवघड काम आहे आणि हेच जगातील सर्व प्रकारच्या समस्यांचे उत्तरही आहे.
ओझे:
कालचे ओझे कचराकुंडीत फेकायला, उद्याचे ओझे उद्या उचलायला व आजचे ओझे आजच उचलायला शिकून घेऊया.
मोजदाद:
धन्यवाद देता येईल, क्रुतज्ञता व्यक्त करता येईल, अशा सर्व गोष्टींची व घटनांची मोजदाद करूया व आनंदी होऊया.
ब्रीदवाक्य:
आपली बलस्थाने, कच्चे दुवे, ध्येयधोरणे आणि भावभावना यांच्या संयोगातून, पुनरूक्तीसाठी एक स्वतःचं “ब्रीदवाक्य” बनवूया.
उत्तम:
“नाही” म्हणाली तर दुःखाने मरून जाईल, “होय” म्हणाली तर आनंदाने मरून जाईल, अशा अवस्थेत प्रपोज न करणे उत्तम.
सोपवूयात:
जीवनातील ज्या समस्या आपण सोडवू शकतो त्या सोडवूयात, राहीलेल्या परमेश्वरावर किंवा निसर्गावर सोपवूयात.
मोकळे:
नवीन व आकर्षक आव्हानं पेलताना, परतीचे व मदतीचे मार्ग मोकळे ठेवलेले असणे, स्वतःसाठी आवश्यक व फायदेशीर असते.
गायब:
आपल्या ज्या काळज्या व चिंता ऐकून इतरांना हसू येतं, त्यांवर आपणही हसायला सुरुवात केल्यास त्या चिंता गायब होतात.