जीवनातील ज्या गोष्टींबद्दल आपल्या तनामनात नकारात्मक भावना असतील, त्याबद्दल मनात असणारी विचारसूत्रे बदलणे गरजेचे आहे.
Category: Uncategorized
बनत:
आपण जे काही शिकत जातो, ज्याचा अभ्यास करत रहातो आणि जे डोक्यात व मनात भरत जातो तेच व तसेच बनत जातो.
मनात:
आपल्याला एखादी गोष्ट मनोमन पटते व आपण ती स्वीकारतो, ती खरोखरच बरोबर असते म्हणून नव्हे तर आपल्या मनात असते म्हणून.
कारणं:
ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे मोठ्ठी व प्रबळ कारणं असतात, त्या गोष्टी आपण मनापासून करतो, कितीही अडचणी आल्या तरीही.
नम्रता:
आपल्याला ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तात्काळ शिक्षण घ्यायला सुरुवात करणे म्हणजे नम्रता व आत्मविश्वास.
स्वतः
आपण जी गोष्ट स्वतःला देतो व स्वतःसाठी करतो, तीच गोष्ट आपण इतरांना देऊ शकतो व इतरांसाठी करू शकतो.
करणे:
फक्त विचार करणे, स्वप्न पहाणे किंवा बोलत रहाणे याबरोबरच सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे व करत रहाणे महत्त्वाचे आहे.
पाहणे:
डोळ्यांना फक्त समोरचं आणि त्या वेळचं दिसतं, मनाला मात्र दाही दिशांकडे, क्षितिजापार, सर्व काळ व कालातीत पाहता येते.
आकार:
नशीब घडवणे म्हणजे जे वाट्याला येईल व घडेल त्याचा स्वीकार करणे व त्यालाच आपल्या मनासारखा आकार देत रहाणे.
आराम:
व्यायाम किंवा काम करून थकल्यानंतर केला जातो तो आराम, याउलट ते टाळून किंवा पुढे ढकलून केला जातो तो आळस.