आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे पूर्णपणे माहिती असणे व त्याच्या मर्यादेतच रहाणे, वागणे व बोलणे म्हणजे आरामदायी असणे.
मजा:
अनिश्चित परिस्थितीची भीती किंवा काळजी वाटल्यास, थोडं धाडस करून त्या गोष्टींना तोंड देता देता, थोडी मजा करायला शिकूयात.
धाडस:
आपल्या आरामदायी क्षेत्राच्या पलिकडे जाऊन लोकांशी वागण्याचा, बोलण्याचा व जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धाडस.
स्वीकार:
भीतीमधीलअस्वस्थतेचा स्वीकार करूयात व आराम वाटेपर्यंत त्यात रहायची सवय लावूयात, व्यक्तीमत्वाला पैलू पाडूयात.
पातळी:
नव्या परिस्थितीला सामोरे जाताना सौम्यपणाने वागणे व अभ्यास करणे, यांमुळे आपण आपली वाटचाल व पातळी दोन्ही सुधारू शकतो.
नऊ दिवस:
“नव्याचे नऊ दिवस” ही गोष्ट जितकी आनंदाला लागू होते; तितकीच दुःख, निराशा, वैफल्य, भीती, काळजी या भावनांनासुद्धा लागू होते.
क्रुतीशील काळजी:
आपलं खरं प्रेम व दयाळूपणा हे क्रुतीशील काळजीतून दिसून येते, क्रुतीशून्य राग, चिडचिड, अबोला व बडबड यांतून नव्हे.
कल्पना:
आपण स्वतः अधिक हुशार, बुद्धिमान, चौकस, जिज्ञासू, अभ्यासू व गुणी आहोत, अशी कल्पना केल्यास परिस्थितीनुरुप तसेच बनू शकतो.
इतरांच्या भूमिकेतून:
कादंबरी वाचनाने आपण इतरांच्या भूमिकेतून विचार करायला व त्यांच्या जागेवरून सद्याच्या परिस्थितीकडे पहायला शिकू शकतो.
संबंध:
दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून, त्याची परिस्थिती, गरज व इच्छा समजून घेऊन त्यांच्याशी वागल्याने संबंध सुधारू शकतात.