“आपण दुःखी असतो कारण आपल्याला हवं ते मिळालेले नसते,” या ग्रुहीतकामुळे आपण जे हवंय ते मिळवण्यासाठी धडपड करतो.
बरं व छान:
मस्त व छान वाटण्यासाठी, अगोदर आपल्याला आपला भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांविषयी बरं व छान वाटायला हवं.
आंतरिक यश:
आपल्याला आपल्याबद्दल जे जे काही वाटते, त्यामुळे आपल्याला आनंदी व समाधानी वाटणे, म्हणजे आपले वैयक्तिक आंतरिक यश.
दुरूस्त:
लौकिक यश व वैभव मिळूनही, जर आपण असमाधानी व दुःखी असू तर, आपल्याला वैयक्तिक पातळी दुरूस्त करायला हवी.
पहिली पायरी:
आपल्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने व उद्दीष्टे पूर्ण करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतः, इतरेजन व परिस्थिती यांबद्दल क्रुतज्ञता बाळगणे.
उलट्या दिशेने:
“आहे त्यात सुखी असणे,” ते “अधिकाची अपेक्षा” ते “पुढचे उद्दिष्ट ठरवणे,” या मार्गावर, आपण उलट्या दिशेने जायला बघतो.
मर्मज्ञान:
“आपला आनंद बाह्यजगातील परिस्थितीवर अवलंबून नाही,” हे मर्मज्ञान झाल्यानंतर आपला आनंद कायमस्वरूपी टिकून राहू शकतो.
आंतरिक:
वैयक्तिक यशाचे सार, योग्य वेळी आपली आनंद, प्रेम, शांती व आत्मविश्वास यांची योग्य आंतरिक तार, छेडण्यामध्ये आहे.
उत्तम:
“शिकून मोठ्ठं व्हायचं,” हे आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर चुका, अपयशं व तडजोडी हे आपले उत्तम शिक्षक व मित्र असतात.
रूपांतर:
आपण आपल्या नकारात्मक जाणिवांचे रूपांतर सकारात्मक जाणिवांमध्ये करायला शिकणे म्हणजे, वैयक्तिक पातळीवरचे यश.