स्वप्नं पाहण्यामध्ये आपण इतकेही गुंगू नये, की ती स्वप्नं साकार करणारी साधनं व माध्यमं, यांना विकसित करायचे साफ विसरून जाऊ.
पूर्वग्रह:
अपुऱ्या माहितीवर आधारित असलेली, आपली काही ग्रुहिते व पूर्वग्रह, गरजेची नवीन माहिती ऐकून घेण्यापासून, आपल्याला रोखतात.
मत:
एखाद्याचे ऐकून घेत असताना आपल्याला सर्व समजले आहे, असे वाटेपर्यंत आपले मत व मूल्यांकन मांडणे, पुढे ढकलणे बरे.
ठाम:
एखाद्याला आवडत नसले किंवा कोणीतरी टीका करत असले तरीही आपण आपल्या निवडींवर ठाम रहायला शिकूया.
खात्री:
जीवनातील अपयशातून, धडे घेऊन, पुनःपुन्हा खडे होऊन, उत्साही प्रयत्नांचे सडे पाडणे म्हणजे, बडे होण्याची खात्री.
गरज:
नवीन ज्ञान घेणे, आपला द्रुष्टीकोन बदलणे, अधिक कौशल्ये विकसित करणे व सातत्याचा अनुभव घेणे, यासाठी गरज आहे अपयशाची.
मानत:
ज्या गोष्टींच्या आधारे आपण आपले निर्णय घेतो त्या गोष्टींना आपण मनापासून व उत्कटपणे मानत आलेलो असतो.
अर्थ:
जेव्हा पैसा आपल्याला प्रेरित करू शकत नाही तेव्हा, त्या पैशापलीकडची स्वप्नं आपल्या जीवनाला खरा अर्थ, प्रदान करू शकतात.
प्रेरित:
जी गोष्ट आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपल्याला अधिक प्रेरित करू शकत नाही.
इच्छा:
अधिक सशक्त बनण्याच्या इच्छेमध्ये, ओघानेच येणाऱ्या इच्छा म्हणजे, काही नवीन शिकण्याची इच्छा व त्यानुसार स्वतःला बदलण्याची इच्छा.