आपल्या स्मृती व आठवणी, आपल्या नकळत काळानुरूप बदलत जातात, पण आपण मात्र त्यांच्या सत्यतेवर व विश्वासार्हतेवर ठाम असतो.
प्रेम:
स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला काय वाटते व भावते ते लिहून काढणे, वाचणे व ऐकणे किंवा तोंडी शब्दांनी भावनांना वाट मोकळी करून देणे.
अडचण:
प्रेमळ सुसंवाद साधण्याच्या, आपल्या मार्गातील सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्या अंतर्मनात पुरून ठेवलेल्या, आपल्या नकारात्मक भावना.
टाळण्यासाठी:
मनातील नकारात्मक भावनांना टाळण्यासाठी, आपण वारंवार करत असलेली प्रत्येक क्रुती, नंतर आपले जीवन नियंत्रित करायला लागते.
समजून घेऊन:
जेव्हा आपल्या स्वतःच्याच भावना दुखावलेल्या असतात, तेव्हा इतरांच्या नाजूक भावना समजून घेऊन, त्यांचा आदर करणे, हे अवघड कार्य आहे.
संवाद साधणे:
आपापल्या मनातील बदलत जाणाऱ्या भावनांविषयी व गरजांविषयी एकमेकांशी बोलून संवाद साधणे, हे प्रेमळ नातेसंबंधाचे गमक आहे.
मनमोकळे:
नातेसंबंधांमध्ये मनमोकळे होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या नकारात्मक भावना हाताळायला शिकणे आवश्यक आहे.
काळजीपूर्वक ऐकणे:
भावना काळजीपूर्वक ऐकणे म्हणजे त्या नाकारण्याचे, त्या बदलण्याचे व त्या सुधारण्याचे सर्व प्रयत्न थांबवून, प्रेमळ व समंजस बनायला शिकणे.
घेरल्यावर:
नकारात्मक भावनांनी घेरल्यावर समजूतीने, आदराने, आस्थेवाईकपणे व क्रुतज्ञतेने बोलणे आपल्यासाठी अवघड असते, अशक्य नव्हे.
बचावात्मक:
प्रिय व्यक्तीच्या नकारात्मक भावना, जर तक्रार समजून व्यक्तीशः घेतल्या, तर आपण बचावात्मक बनतो व संवाद बिघडवून टाकतो.