आपल्याला आपल्या मनातील अस्वस्थतेची जाणीव झाल्यावर, त्या अस्वस्थतेबाबत पुन्हा अत्यवस्थ होणे टाळायला शिकूया.
विधायक:
आपल्याला जाणवणाऱ्या काही क्लेशदायक, नकारात्मक व अप्रिय भावना स्वास्थ्यकारक व विधायक असू शकतात.
समस्या निर्मूलक:
आपले दृष्टिकोन प्रिय, आनंददायक व होकारार्थी नसले तरी चालतील, मात्र हितकारक व समस्या निर्मूलक असायला हवेत.
वास्तव:
आपल्या सगळ्या सकारात्मक भावना या चांगल्या नसतात व सगळ्या नकारात्मक भावना वाईट नसतात, ते तर वास्तव ठरवते.
कारण:
आपलं हट्टी, दुराग्रही, अवास्तव किंवा अविवेकी जीवन तत्वज्ञान हे आपल्या अस्वस्थतेचं कारण तर नाही ना? ते शोधूयात.
तोडगा:
आपली संकटं सतत काळजी करून दूर होत नाहीत तर त्यावर विचार व चर्चा करून आणि तोडगा काढून दूर होतात.
समतोल:
आपले दृष्टिकोन जर आपल्या उद्दिष्टांशी समतोल साधत नसतील तर त्या दोन्हींपैकी एक किंवा दोन्ही बदलायला शिकूया.
परिणाम:
आपल्या मनात येणारे नानाविध विचार, प्रतिमा व स्वगत हे आपल्या मनातील दृष्टिकोनांचे परिणाम असतात.
भावना:
आपल्या वागणूकीला चालना देणारा प्रत्यक्ष घटक म्हणजे भावना तर अप्रत्यक्ष घटक म्हणजे विचार तोही पुन्हा भावनांद्वारेच.
बरे-वाईट:
आपल्या मनात बऱ्या-वाईट भावना निर्माण करण्याचे व त्या टिकवून ठेवण्याचे काम करतात आपले स्वतःचेच बरे-वाईट विचार.