स्वतःमध्ये व जीवनामध्ये सुधारणा करण्याची पहिली पायरी म्हणजे तशी सुधारणा करण्याची गरज असल्याची माहिती व जाणीव होणे.
विसंगती:
आपल्या अंतरंगातील आपलं असणं आणि आपलं बोलणं, वागणं व दाखवणं यांमधील विसंगती म्हणजे अप्रामाणिकपणा होय.
मदत:
इतरांना मदतीचा हात देण्यासाठी, त्याअगोदर आपण आपल्याला मदत केली पाहिजे; स्वतःला समजून घेऊन व स्वतःला शोधून.
ओळख व सलोखा:
आपल्या जाणीवांशी, भावनांशी व त्यांच्या कार्यकारणभावाशी ओळख व सलोखा, असणे म्हणजे जाणता; तर नसणे म्हणजे नेणता.
जाणकार:
आपण आपलं लक्ष जेव्हा बाह्य गोष्टींवरून हटवून अंतर्मनातील अंतर्गत गोष्टींवर न्यायला शिकतो तेव्हा जाणकार बनतो.
दिशादर्शक:
आपल्या अंतर्मनातील संवेदना, वेदना, जाणीवा, भावना व अनुभव हे आपले बाह्यजगातील सर्वोत्तम मार्गदर्शक व दिशादर्शक ठरतात.
कुरतडत:
आपल्याला मिळालेले यश व सम्रुद्धी जर आपल्याला कुरतडत असेल तर आपण निवडलेला मार्ग किंवा पद्धत बदलायला हवी.
आत्मजागरूकता:
शरीरात आपल्या कातड्यापासून ते आतड्यापर्यंत काय चालू आहे? व का? याची जाणीव असणे म्हणजे आत्मजागरूकता.
हरखून:
आपल्याला हरखून टाकणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतील तर संसारात व जगरहाटीत आपण हरवून जाऊ शकतो.
अनियंत्रित:
अतिशय हुशार व बुद्धिमान माणसांना मुर्खांत व वेड्यांत जमा करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनियंत्रित भावना.