आपल्याला जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीची अतिचिंता वाटते तेव्हा त्याविषयीचे जुने रेकॉर्ड व आकडेवारी तपासून पहाणे बरे.
दुःखे:
आपली जवळजवळ सर्व दुःखे ही आपल्या कल्पनेतून तयार होतात, वास्तवातील सरासरी व शक्यता खूपच कमी व आशावादी असते.
खरेखुरे:
कशाकशाकडे दुर्लक्ष करायला हवे व कायकाय विसरायला हवे हे समजणे म्हणजे जीवनातील खरेखुरे शहाणपण व हुशारी होय
मार्ग:
चिंतेने आपल्याला संपवून टाकण्याच्या अगोदरच, आपण आपल्या चिंतांना संपवून टाकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढूयात.
महत्त्व:
आपल्या जीवनात एखाद्या गोष्टीचे महत्त्व किती आहे? हे त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी आपण किती वेळ देतो यावरून ठरते.
घरगुती:
तिरकस बोलणे, अपमानास्पद टीका करणे, बोचरे शब्द, दारूमय शौर्य व कोरडे वागणे ही घरगुती वादाची खरी कारणे आहेत.
वार:
ह्रदयाचे तुकडे तुकडे करणाऱ्या जवळपास सर्व गोष्टी बारीकसारीक वाटतात पण त्या स्वाभिमान व अहंकारावर वार करतात.
वापरूया:
आपले जीवन लहानसहान व तात्पुरत्या गोष्टींसाठी वापरण्याऐवजी महान विचार, भावना व मोहीमा यांसाठी वापरूया.
तटस्थ:
तटस्थ राहणे म्हणजे काहीच न करणे नव्हे, तर भावनेच्या भरात काहीही करण्यापेक्षा त्या घटनेकडे दूरून व विशाल कोनातून पहाणे.
खुला:
आपली समस्या योग्य, निष्पक्ष व निरपेक्ष पद्धतीने मांडणे म्हणजे समस्या आपोआप सोडवण्याचा मार्ग खुला करणे.