सावधान-विश्राम या सूचना, जशा आपण शरीराला देऊ शकतो, तशा मनालाही द्यायला शिकलोत तर, लाइफ झिंगालाला.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
सुरक्षित:
रूळलेल्या व गर्दीच्या जीवनमार्गावरून जाताना, मनाला सुरक्षित वाटते, पण आपल्या स्वप्नांचे पक्षी, पिंजऱ्यात अडकतात.
नजरेआड:
स्वतःबद्दलच्या व इतरांबद्द्लच्या आपल्या मनातील प्रतिमांच्या आडून, वास्तव स्थिती नजरेआड होऊन, हाताबाहेर जाऊ शकते.
जर तर:
स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे म्हणजे, घडून गेलेल्या नकोश्या घटनांसंबंधी, ‘जर-तर’ स्वरूपाचे अतिसंवाद करीत रहाणे.
आज:
मनाने “काल”च्याच नजरेने “आज”कडे पहायचे ठरवल्यावर, “आज” आपल्या डोळ्यांना काय दिसले याचे महत्त्व कीतीसे असणार?
मुक्त:
भूतकाळातील नकारात्मक घटनांपासून व भावनांपासून मुक्त होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे, त्या घटनांचा मनापासून स्वीकार.
वापर:
आपल्याला जे बनायचे व मिळवायचे आहे, ते बनण्यासाठी व मिळवण्यासाठी, आपण आपल्या समस्यांचाच वापर करूया.
गोंधळ:
परिस्थितीबाबत आपल्या मनात काही गोंधळ उडालेला असेल तर, त्यावर रामबाण उपाय म्हणजे, त्या परिस्थितीचा स्वीकार.
वाढत:
ज्या गोष्टींना आपण विरोध करतो व त्यांचा अस्वीकार करतो, त्यांवर आपलं लक्ष केंद्रित होतं, त्या गोष्टी आपल्या मनात, वाढत जातात.
शिकलो:
एखाद्या घटनेनंतर उदास वाटल्यास, यातून आपण काय शिकलो? या प्रश्नाची उत्तरे शोधू लागणे, म्हणजे स्वःविकास साधणे.