अप्रिय, नापसंत व नावडीच्या गोष्टींचा, स्वीकार केला, तर लगेचच आपल्याला हलकं हलकं, शिथिल व मोकळं ढाकळं वाटायला लागतं.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
जवळीक:
भीतीतून उगवलेल्या विचारांना बाजूला सारून, आपण भलेपणा, करुणा व शांती यांमधून उगवलेल्या विचारांशी जवळीक करूयात.
संघर्ष:
बाह्य जगतातील संघर्ष लढण्यासाठी, आपल्या अंतर्गत जगतातील संघर्षांमध्ये, वाया जाणारी शक्ती, आपण वाचवायला हवी.
जाणणे:
आपण केलेल्या क्रुतीच्या पाठीमागील, अद्रुष्य समज व उमज, धुंडाळून समोर आणणे व त्यांची ओळख करून घेणे, म्हणजे स्वतःला जाणणे.
चिकित्सा:
चिकित्सा करण्यासाठी स्वतःच्या मनातील, धारणा, विचार आणि भावना हे जगातील सर्वोत्तम विषय आहेत.
उत्तर:
आपल्याला काय करावेसे वाटते? व का? याचे जे उत्तर आपल्याला आपल्या अंतःकरणातून मिळेल तेच उत्तम उत्तर असेल.
रूप:
आपल्या अंतर्मनाचे हवेहवेसे व संपूर्णपणे नवे रूप, आपण तयार केल्यास, आपल्यासमोर संपूर्णपणे नवे जग, प्रकट होऊ शकेल.
द्विधा:
दोन विचार, दोन दिशा किंवा दोन पद्धती यांपैकी निवड करतानाची आपली द्विधा मनस्थिती आपले अंतरंगच दूर करू शकते.
सीमारेषा:
आभास, कल्पना, प्रतिमा, स्वप्नरंजन, दिवास्वप्न आणि वास्तव यांमधील पुसट सीमारेषा, वारंवार जागरूक होऊन स्पष्ट करूयात.
अंतर:
आपण जसे दिसतो आहोत व जसे स्वतःला प्रदर्शित करीत आहोत व जसे आंतरिक विश्वात आहोत, यांतील अंतर आपण कमी करूयात.