बाह्य जगाच्या रेट्यामुळे निवडलेल्या जीवनमार्गापेक्षा, आंतरिक रेट्यातून निर्माण केलेला नवीन जीवनमार्ग, नेहमीच श्रेयस्कर असेल.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
विरोधात:
निश्चितता व सुरक्षितता वाटवण्याच्या खटपटीत, आपले मन आपल्या अंतरंगातील आदर्शांच्या व मूल्यांच्या, विरोधात काम करते.
आरपार:
ज्या ज्या समस्या व अडचणींमधून आपण आरपार पाहतो व सहजपणे पार करतो, त्या त्या ठिकाणी आपण आपला जीवनमार्ग बनवतो.
समज:
आपल्या मनातील गोंधळ, संदिग्धता व संदेह समजून घेऊन, आपली समज वाढवत नेणे, म्हणजे आत्मसमर्पण व्रुत्तीने जगणे.
नवीन:
नवीन व विकसित परिणाम हवे असतील तर आपल्याला दररोज त्याच त्याच गोष्टी न करता, काही नवीन गोष्टी कराव्या लागतील.
उत्तर:
भूतकाळाबाबत का? या बेडीरूपी प्रश्नाचे उत्तर शोधण्याऐवजी, वर्तमानाबाबत कसे? या स्वातंत्र्यरूपी प्रश्नाचे उत्तर शोधणे, उत्तम.
समिक्षण:
आपल्याला ताण येतो तेव्हा, तो प्रसंगाचा दोष नसतो, आपल्या मनाने, प्रसंगाचे जे विश्लेषण व समिक्षण केले, त्याचा असतो.
माध्यम:
निराश व दुःखी होणे, हे चांगले आहे, स्वतःला जाणण्याचे व ओळखण्याचे ते कारण व माध्यम आहे, स्वःविकासाची ती शीडी आहे.
होय:
मी हे स्वीकार करू शकतो काय? या स्वःप्रश्नाला ‘होय’ उत्तर देऊन, आपण बाहेरील व मनातील घटनांचा, उत्तम सामना करू शकतो.
संधी:
आपल्या जीवनातील प्रत्येक घटना, आपल्यासाठी काहीतरी, उघड किंवा छुपी नवीन संधी देण्याकरीताच आलेली असते.