बघायचेच आहे तर इतरांमधील सद्गुण बघायचे ठरवूया, शोधायचेच आहे तर इतरांमधील कौतुकास्पद गोष्टी शोधायचे ठरवूया.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
मार्ग:
कोणतेही काम करण्याचा, योग्य मार्ग निवडणे व नेहमीच्या वळणाचा सोपा मार्ग सोडून देणे, आपल्याला हळूहळू स्वःविकासाकडे घेऊन जाते.
घडामोडी:
जगातील ताज्या घडामोडींबरोबर होणाऱ्या, आपल्या मनातील ताज्या घडामोडींबद्दल, आपण जास्त जाग्रुत व सजग असलेले बरे.
ऊगम:
प्रेरक शक्ती या बाहेरील परिस्थितीतून नव्हे तर, आपल्या अंतकरणातून ऊगम पावतात आणि आपल्याला बेधडक व धैर्यशील बनवतात.
सतर्क:
हरेक सहवास, मैत्र, संगत व संपर्क आपल्या मनावर काहीतरी परिणाम करतच असते, त्याबाबत आपण नेहमी सतर्क व जागरूक राहूया.
उत्तम:
जर कधी दुःख व उद्विग्नता आली तर काय करायचे, हे आपण आनंदात व सुखात असताना अगोदरच ठरवून ठेवणे कधीही उत्तम.
पुढे:
समस्या पुढे ढकलणे म्हणजे आपल्या मनाची समज वाढवण्याची, बोध घेण्याची व हवं ते मिळवण्याची सुवर्णसंधी पुढे ढकलणे.
त्रास:
आपण त्रासलेले असतो तेव्हा, एकतर आपला द्रुष्टीकोन चुकीचा असतो किंवा आपली विचारांची निवड चुकीची असते.
साक्षी:
स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या मनस्थितीचे, स्वतःच्या मनाच्या सहाय्याने, स्वतःच्याच मनाला साक्षी बनवणे, म्हणजे आत्मविकास.
आत्मपरीक्षण:
आपल्या मनातील भावनांचा व मनाच्या अवस्थेचा, प्रसंगातून जाताना व प्रसंगानंतर आढावा घेत रहाणे, म्हणजे आत्मपरीक्षण.