एखाद्याला दयाळूपणा, चांगुलपणा व सहानुभूती दाखवण्याची क्रुती, पुढे न ढकलता व न टाळता, आत्ता लगेच पूर्ण करायला शिकूया.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
साक्षीदार:
आपल्या मनातून येणाऱ्या व जाणाऱ्या विचारांच्या, मोहात न पडता, त्यांचे साक्षीदार होण्याचा सराव, म्हणजे आत्मनिरीक्षण.
विरजण:
आपण काहीतरी साध्य केल्यानंतर, होणाऱ्या आनंदावर, मनातून येणारे जे विचार विरजण घालतात, ते सर्व नकारात्मक विचार.
प्रकट:
जेव्हा अडथळे, समस्या, वेदना व दुःखे समोर येतात, तेव्हा बाह्यजगातील प्रेरणा गायब होतात, तर अंर्तमनातील प्रेरणा प्रकट होतात.
ठरवणे:
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे क्रुतज्ञतेने व लक्ष देऊन पाहण्याचे ठरवतो, तेव्हा ती गोष्ट सुंदर व अवर्णनीय वाटायला लागते.
बरं:
कुठल्याही बाबतीत आपल्याला बरं वाटत असेल तरच, आपण बरं काम करू शकतो, म्हणून स्वतःला बरं वाटण्याचे मार्ग शोधूया.
सांभाळ:
आपल्याला जर इतरांचा सांभाळ करायचा असेल, तर आपण स्वतःचा सांभाळ करण्यासाठी जास्त वेळ द्यावा, हे बरे.
अंमल:
आपण रागावलेले असताना, घेतलेला निर्णय व निवडलेला उपाय, आपण शांत झाल्यानंतर अंमलात आणणे कधीही योग्य.
ओळख:
स्वतःसाठी काढलेला वेळ म्हणजे, आपली स्वतःची स्वतःच्या मनाशी व अंर्तबाह्य प्रेरणांशी ओळख वाढवण्यासाठी काढलेला वेळ.
जीवन:
जीवन म्हणजे आपल्या मनाने स्वतःच्या शब्दांत केलेली त्याची व्याख्या, काढलेला त्याचा अर्थ व रंगवलेले त्याचे काल्पनिक चित्र.