जीवनातील घडामोडींचा आपण मनाने काहीतरी अर्थ लावतो, हा अर्थ नंतर आपली वाट लावतो किंवा आपल्याला वाटेला लावतो.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
चांगली:
जर आपल्या क्रुतीतून प्रेमभाव वाढत असेल, अथवा वैरभाव व भयगंड कमी होत असेल, तर ती क्रुती चांगली आहे असे समजूया.
शोधा:
जगण्यासाठी झगडता झगडता, नकळत आपले मन आपल्याला, झगडण्यासाठीच जगवत नाही ना? हे आपण क्षणोक्षणी शोधावे.
प्रेम:
आपण आपले हक्क व अधिकार यांवर जितके करतो, त्याहून जास्त प्रेम, कर्तव्यांवर व श्रमांवर करायला शिकणे, गरजेचे आहे.
मनासारखं:
सगळं मनासारखं व्हायचा अट्टहास करण्याच्या नादात, जे काही थोडंफार मनासारखं झालेलं असतं, तिकडंही दुर्लक्ष होऊ शकतं.
योग्यता:
इतरांची योग्यता आपले मन त्यांच्या सद्गुणांनुसार ठरवीत नाही, तर स्वतःच्याच आवडीनुसार ठरवते, हे आपल्या लक्षात असावे.
आपल्या जीवनात आलेल्या व सध्या असलेल्या, जवळच्या व दूरच्या सर्व लोकांना, मोफत व बिनशर्त द्यावी अशी गोष्ट म्हणजे माफी.
मनस्थिती:
वस्तुस्थिती व परिस्थितीमधील अंतर म्हणजे मनस्थिती, कारण आपली मनस्थिती आपली परिस्थिती ठरवते, वस्तुस्थिती नव्हे.
व्यवस्था:
‘आला दिवस सारखाच’ ही अवस्था, बदलण्यासाठी उत्साही, विकसित व विवेकबद्ध विचार मनात पेरण्याची, नवी व्यवस्था करायला हवी.
प्रत्यक्ष:
लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्या मनाला वाटते, त्यापेक्षा लोक आपल्याशी प्रत्यक्ष जसे वागतात, तसाच त्यांचा स्विकार व्हावा.