चित्त विचलित व अशांत असताना, आपली बुद्धी संपूर्णपणे, चित्त स्थिर व शांत करण्यावर केंद्रित करणे, म्हणजे बुद्धीचा सर्वोत्तम वापर होय.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
तंत्रज्ञान:
तंत्रज्ञान आपल्याला दैनंदिन कामात मदत करण्यासाठी व आपले जीवन सहजसोपे करण्यासाठी आणि ताणतणाव व गुंतागुंत कमी करण्यासाठी आहे.
मनस्थिती:
आपली मनस्थिती ठीक नसेल, तेव्हा स्वतःशी योग्य व व्यावहारिक बोलण्याची आणि स्वतःला माणसाप्रमाणे व न्यायबुद्धीने वागवण्याची गरज असते.
खेकडे:
आपल्याला आपला कोणताही विकास करण्यापासून रोखणारे व खाली खेचणारे जवळपास सर्व खेकडे, आपल्याच मनात असतात; जनात नव्हे.
प्रतिभावंत:
जी कामे आपण उत्तम क्षमतेने, गुणवत्तापूर्ण व आनंदाने करतो, ती काळजीपूर्वक शोधणे व करत राहणे म्हणजे प्रतिभावंत होणे.
समतोल:
आपल्या मनाचा तोल ढळत असेल तर आपण एका टोकाचा विचार करतोय, समतोल राखण्यासाठी संतुलित विचारांचा शोध घेणे गरजेचे आहे.
वेळेचे नियोजन:
आपली महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करून, उरलेला वेळ आपल्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबीयांसोबत आनंदात घालवणे, म्हणजे वेळेचे नियोजन.
कमकुवतपणा:
आपला कमकुवतपणा अयोग्य व तर्कविसंगत असल्याचे ठरवून, स्वतःचा बचाव करण्याचे बंद करून, आपण त्यावर मात करू शकतो.
अर्थ:
आपण आपल्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचा, जेव्हा काही उत्तमोत्तम असा अर्थ काढतो, तेव्हा आपण आपले जीवन यथार्थ बनवत असतो.
यशस्वी:
एखादा अयशस्वी होऊनही,जर त्यातून काहीतरी शिकण्याचा व स्व:क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला यशस्वीच म्हणावे लागेल.