धकाधकीच्या जगामुळे आपलं जीवन फक्त १०% खडतर होतं, उरलेलं ९०% खडतर जीवन आपल्या त्या घडामोडींना हाताळण्याच्या पद्धतीमुळे होतं.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
आत्मपरीक्षण:
आपल्या कसल्याही समस्येची नेमकी शहानिशा करून त्यात सुधारणा करण्यासाठी लागणारे ‘आत्मपरीक्षण करणे’ हे कौशल्य सजगपणे शिकून घेऊया.
बदल:
बदल घडवून आणण्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करू, राजीखुषीने करू, वागण्याबोलण्याची व त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारू.
बदलत नाही:
आपण बदलत नाही कारण आपण आपापल्या वाट्याची जबाबदारी घेण्याऐवजी दोष देतो, समर्थन करतो, पुरावे सादर करतो आणि वाद घालत बसतो.
प्रभावी:
हुशार असणे, शिकलेले असणे व कुशल असणे पुरेसे नाही, प्रभावी होण्यासाठी आपले स्वतःचे विचार व धारणा आपल्याला शुद्ध करावे लागतात.
रागमुक्ती:
आमच्या रक्तातच राग आहे, अख्खं खानदान रागीट आहे म्हणून मी आहे, असं म्हणून आपल्याला फक्त सहानुभूती मिळेल, रागमुक्तीची अनुभूती नाही.
पुढाकार:
“कोणीतरी मला यातून सोडवावे”, असे वाटते तेव्हा हा “कोणीतरी” आपण स्वतःच होणे व त्यासाठी वारंवार प्रयत्न करणे म्हणजे पुढाकार घेणे.
जबाबदारी:
आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी इतर कोणावरही न फोडता, ती स्वतः स्विकारणे, ही नेतृत्व करण्याची, पहिली पायरी आहे.
शुद्ध विचार:
प्रभावी व्यक्तीमत्वासाठी आवश्यक असणारे शुद्ध विचार म्हणजे उच्च जीवनमूल्यांवर आधारलेले, कुठेही न भरकटणारे विचार.
आंतरीक:
आपलं संपूर्ण बाह्य वर्तन व व्यक्तीमत्व हे पुर्णपणे आपल्या आंतरीक मान्यता व विचारांप्रमाणेच होत असते, याचे सदैव भान ठेवूया.