“आपण बरोबर आणि समोरचा चूक” या आपल्या घटनेकडे पाहण्याच्या पद्धतीमुळे, आपले संभाषण व काम ठप्प होऊ शकते.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
कचरापेटी:
चुकलेल्या व बिघडलेल्या गोष्टी आपण कचरापेटीत टाकतो; विचार, घटना, अनुभव व काम यांनाही अगदी असंच करायला शिकूयात.
आभार:
आपल्या कामाची, गुणांची किंवा आपली स्तुती आणि कौतुक, करणाऱ्या लोकांना न अडवता, त्यांचे आभार मानायला शिकूयात.
फेरमांडणी:
आपल्याला जे ‘मनापासून आवडते’ आणि ‘छान जमते व येते’, त्यासाठी ‘अधिक वेळ’ देऊन आपल्या दिनक्रमांची ‘फेरमांडणी’ करुयात.
उजळणी:
आपण कोणकोणत्या चांगल्या गोष्टी केल्या? त्या कोणत्या मार्गाने व पद्धतीने केल्या? यांची उजळणी आपल्याला प्रोत्साहित करते.
बळी:
आपण ‘इतर कोणी किंवा परिस्थिती’ यांचे ‘बळी’ नसतो, तर आपलेच ‘विचार व द्रुष्टीकोन’ यांचे ‘बळी’ असतो, हे जाणायला शिकूयात.
आहारी:
आपण “भावनेच्या आहारी” जाऊ शकतो तसे “तर्काच्याही आहारी” जाऊ शकतो, दोन्हींचा समतोल राखायला प्रयत्न करुया.
ठीक किंवा चांगली:
“आपल्या स्वतःसकट सर्वच माणसे मुळात ठीक किंवा चांगली असतात”, असा विचार आपल्या मनात व बुध्दीत सतत बाळगायला शिकूयात.
निर्णय:
भावनांच्या आहारी न जाता शांत चित्ताने व थंड डोक्याने, परिस्थिती समजावून व विचार, हेतू व उद्देश जाणून घेऊन, निर्णय घ्यायला शिकूया.
समजूतदार:
समजूतदार असणे म्हणजे आपल्या विनंतीचे किंवा मागणीचे कुठलेही खरे, सयुक्तिक, सबळ, पटेल असे कारण स्पष्टपणे सांगता येणे.