विनंती करताना थातूरमातूर, लंगडी, दुर्बळ, विश्वास बसणार नाहीत, खरी वाटणार नाही अशी कारणे देणे, आपण टाळायला शिकूयात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
जास्त:
“अपेक्षेपेक्षा काहीतरी जास्त मिळते आहे”, ही समजूत किंवा आभास आपल्याला त्या वस्तूच्या मोहात पाडते, हे जाणायला शिकूयात.
सुजाण पालकत्व:
आपल्या पाल्याचे मन व मेंदू सहजपणे हाताळू शकेल एवढ्याच कल्पना व पर्याय शोधायला त्याला मदत करणे म्हणजे सुजाण पालकत्व.
शहाणपण:
आपल्यासमोरील अगणित पर्यायांमधून आपल्यासाठी योग्य व मोजके असे पर्याय निवडून त्यावर काम करणे, म्हणजे शहाणपण.
पर्याय:
जेव्हा आपल्यासमोर खूप जास्त पर्याय असतात तेव्हा आपल्या मनावर दबाव येतो व आपण गोंधळतो आणि पर्यायाने निवड करणे टाळतो.
अनुभव:
प्रत्यक्ष वस्तूंच्या गुणांपेक्षा संदर्भ, परिस्थिती, परिसर, वातावरण हे घटक आपला अनुभव कमी-जास्त सुख, समाधान देणारा बनवतात.
निर्णय:
आयुष्यातील आपल्या अनुभवांबद्दलचे निर्णय, ज्ञानेंद्रिये नव्हे तर, प्रामुख्याने आपल्या मनातील अपेक्षा व आकांक्षा याच घेत असतात.
लक्ष:
जीवन जगताना, विचारांची दिशा ठरवताना, द्रुष्टीकोन निवडताना, निर्णय बदलताना आपण आपल्या भीतींवर जरा जास्तच लक्ष देतो.
मूल्यमापन:
आपले मन “लाभ व फायदा” यांपेक्षा “तोटा व हानी” यांचे मूल्यमापन जास्त चांगले करतो, याचे सतत भान ठेवायला शिकूयात.
जास्त:
पटायला कठीण वाटणारी गोष्ट म्हणजे आपल्या मनात काहीतरी कमावण्याच्या लालसेपेक्षा काहीतरी गमावण्याची भीती जास्त असते.