आपल्याला नको असलेल्या गोष्टींना विरोध केल्याने, हव्या त्या गोष्टी मिळवण्याची आपली ताकद व शक्यता कमी कमी होत असते.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
बनवणारे:
आपल्याला मोठे व यशस्वी बनवणारे विचार सर्वात अगोदर मनात येतात, मग ह्रदयात व अंगात व शेवटी वागण्याबोलण्यात व क्रुतीत.
सकारात्मक:
आपल्या बाह्य आणि अंतर्गत इच्छा, गरजा, ध्येयं व नकारात्मक भावना यांबद्दलही आपण सकारात्मक भावना बाळगायला शिकूया.
मार्ग:
सकारात्मक विचारांकडे व इच्छापूर्तींकडे जाणारा मार्ग, हा नकारात्मक भावनांच्या खाचखळग्यांतून जाणारा असतो.
नादात:
सकारात्मक, आनंदी, सुखी व श्रद्धावान राहण्याच्या नादात, आपण आपल्या खऱ्या भावना व गरजा लपवायला लागू शकतो.
आंधळे व दुबळे:
कोणतीही मूल्यं, ध्येयं किंवा महत्वकांक्षा नसताना मिळालेले यश व किर्ती, नंतर आपल्याला आंधळे व दुबळे करू शकते.
अडवण्यासारखे:
नकारात्मक भावना ताबडतोब सकारात्मक भावनांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे त्यांना मनात अडवण्यासारखे असते.
जेवढे आपण आपल्या भावभावनांना नाकारत जाऊ, तेवढे आपण स्वतःपासून व आपल्या स्वःत्वापासून दूर दूर होत जाऊ.
मनामध्ये घर:
ज्या भावना आपल्या मनामध्ये घर करून राहतील, त्या भावना आपले आयुष्य कसे? व आपले फळ काय? हे ठरवतील.
आपला प्रश्न:
आपल्यामध्ये काही न्यूनगंड असेल तर, तो आपला प्रश्न आहे जगाचा नाही, तो आपला आपणच सुधारायला हवा जगाने नाही.