एकमेकांबद्दल आस्था दाखवण्याच्या, ज्या पद्धती आपल्याला गरजेच्या व योग्य वाटतात, त्या इतरांना तशाच वाटतील असे नाही.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
अपरिहार्य:
नातेसंबंधांमध्ये जेव्हा एक व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवून आणते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीमधील बदल अपरिहार्य असतो.
पात्र:
‘प्रेम व आधार मिळवण्यास आपण पात्र नाही,’ असे वाटणे, हाच ते मिळवण्याच्या मार्गावरील सर्वात मोठा अडथळा आहे.
गरज:
अडचणीच्या काळात, ‘मला कुणाच्या मदतीची गरज नाही,’ असे म्हणणाऱ्या माणसाला त्याची सर्वात जास्त गरज असते.
स्वीकार आणि आधार:
दोषारोप करण्यापेक्षा समजूतदारपणा, विश्वास, सहसंवेदना, स्वीकार आणि आधार हीच प्रभावी समस्या निवारण तंत्रे असतात.
मर्यादा:
एखाद्याची मर्यादा लक्षात आल्यावर, त्याचा गैरफायदा घेण्याऐवजी, त्याला समजून घेण्याचा व आधार देण्याचा मार्ग शोधायला शिकूया.
बरोबरी:
आपण एखाद्यासाठी केलेल्या त्यागाची व उपकाराची त्यानेही बरोबरी करावी, अशी आशा करणे म्हणजे नैराश्याला आमंत्रण देणे होय.
वेळ:
भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती जेव्हा तिच्या समस्यांबद्दल बोलते, तेव्हा सल्ला व उपदेश न देता, सगळे ऐकून घ्यायची ती वेळ असते.
मोकळेपणा:
आपल्याला जे आवडते तेच इतरांना आवडावे, आपल्याला जसे वाटते तसेच इतरांना वाटावे, असे वाटणे सोडणे म्हणजे मोकळेपणा.
सौख्य:
बाह्य परिस्थितीपासून, इंद्रिय संवेदनांपासून, अंतर्गत भावभावनांपासून व विचारतत्वांपासून स्वतंत्र होणं म्हणजे आपलं सौख्य.