आपल्या चांगल्या-वाईट अशा सर्व मनोकायीक संवेदनांना, त्यांच्या त्यांच्या इच्छेनुरूप येण्याजाण्याची मुभा देणे, म्हणजे स्वतंत्र होणे.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
रेस:
बाह्यजगातील ज्या रेसमध्ये आपण पळतो आहे, असे आपल्याला वाटते, ती प्रत्यक्षात आपल्या अंतर्गत जगातील रेस आहे.
वस्तुनिष्ठ:
ज्या बाबी व गोष्टी, आपल्या किंवा इतरांच्या जाणीवा आणि श्रद्धा, यांशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात, त्यांना वस्तुनिष्ठ म्हणतात.
अडचणी:
आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला घडवणाऱ्या संधीच असतात.
लक्ष:
आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींमधून लक्ष कमी करून किंवा काढून टाकून, आपल्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकूया.
भीती:
आयुष्यातील सर्वात मोठा शोध म्हणजे, आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती; ती प्रयत्न, प्रयोग व सरावाने आपण करू शकतो.
अस्तित्वात:
ज्याकडे आपण पळतो, ते म्रुगजळ आणि ज्यापासून आपण दूर पळतो, तो ब्रम्हराक्षस, दोन्हीही प्रत्यक्ष अस्तित्वात नसतात.
मोजमाप:
इतरांकडे काय आहे? आणि काय नाही? हे पाहून, आपल्या यशापयशाचे मोजमाप करण्याची पद्धत, वैफल्य आणणारी आहे.
उत्तर:
इतरांनी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तर आपल्याकडे असते, पण आपण स्वतः ते कसे जगावे? याचे उत्तर मात्र आपल्याकडे नसते.
राखरांगोळी:
जीवनातून आनंद, समाधान व जगण्याचा उद्देश काढून टाकून, त्याची राखरांगोळी करणाऱ्या भावभावना म्हणजे मत्सर, द्वेष, बदला व सूड.