‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, हे फक्त रात्री झोपेत पडणाऱ्या स्वप्नांबद्दलच नाही, तर भर दिवसा, जागेपणी, उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दिवास्वप्नांबद्दलही खरे आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
Category: Uncategorized
जीवन:
माहीतीवरून प्रतिमा, प्रतिमांवरून अपेक्षा, अपेक्षांवरून अंदाज, अंदाजांवरून भाकीत आणि भाकीतांवरून अनुभव या सर्वांची एका समतुल्य माळेतील गुंफण म्हणजे जीवन, हे समजून घ्यायला शिकूया.
अनुभव:
आपण एखाद्या गोष्टीविषयी मांडलेले अंदाज व भाकीते जेव्हा आपल्या मनातील अपेक्षांशी सुसंगत असतात तेव्हा आपल्या मनात आपले अनुभव जन्म घेतात, हे समजून घ्यायला शिकूया.
प्रतिमा व अपेक्षा:
काही गोष्टींमधील मुद्दे व तत्थे जेव्हा आपल्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत तेव्हा त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या मनातील प्रतिमा व अपेक्षा बदलून घ्यायला शिकूया.
प्रतिमा:
आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी असणारी प्रतिमा आपण त्याबद्दल वापरत असलेले शब्द, विशेषणे, हावभाव व देहबोली यांच्या माध्यामातून व्यक्त होते, हे समजून घ्यायला शिकूया.
अपेक्षा:
एखाद्याकडून आपली काय अपेक्षा आहे हे आपण आधीच ठरवलेले असेल तर आपल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या प्रसंगांचे पुरावे तेवढे शोधतो, बाकीचे मात्र सोडून देतो, हे समजून घ्यायला शिकूया.
हजर:
ज्या ठिकाणी व ज्यांच्याबरोबर घडणाऱ्या व असलेल्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात तिथे आपण फक्त म्हणायला हजर असतो शरीराने व मनाने मात्र गैरहजर असतो, हे समजून घ्यायला शिकूया.
अभ्यास:
आपल्याला स्वतःचा अर्जंट अभ्यास सुरू करण्यासाठी सर्वोत्तम विषय म्हणजे तो विषय ज्या बाबतीत प्रतिक्रिया देण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही, हे समजून घ्यायला शिकूया.
आकर्षण व प्रेम:
आकर्षण ही भावना शरीर व इंद्रियांमध्ये उगम पावते व जाणवते, प्रेम ही भावना आकर्षणाचा बौध्दीक अर्थ आहे आणि ते मनात व अंतर्मनात उगम पावते व जाणवते, हे समजून घ्यायला शिकूया.
कोरून:
वारंवार येणाऱ्या कसल्याही प्रसंगात आपण कमीत कमी उद्विग्न व्हावे यासाठी, आपल्याला तेव्हा कसे वाटले पाहिजे? व आपण तेव्हा काय केले पाहिजे? हे आत्ताच आपल्या मनात पक्के कोरून ठेवायला शिकूया.