आपले प्रतिसाद हे फक्त आजूबाजूच्या परिस्थितीनुसार ठरवणे टाळून, आपण खरोखर जसे करायचे, बनायचे व जगायचे पक्के ठरवले आहे त्याला अनुसरून ते बदलायला शिकूया.
Category: Uncategorized
गरजा:
आत्मविकास, आत्मसंतुलन, शांतता, ध्येयकेंद्रता, भविष्यकेंद्रता व आशावाद या आपल्या प्राथमिक मानसिक गरजा असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
निवडलेले:
आपल्या आयुष्यातील शांतता किंवा भयग्रस्तता यांतील अंतर म्हणजे आपल्या अंतर्मनातून येणाऱ्या प्रतिसाद किंवा प्रतिक्रियांमधील आपण स्वतः निवडलेले अंतर, हे समजून घ्यायला शिकूया.
दिवस:
प्रत्येक दिवस सारखाच पण, आपल्या स्वतःच्या भावना, विचार, आठवणी व त्यांना आपण दिलेले अर्थ त्याला चांगला-वाईट, शुभाशुभ बनवतात, हे समजून घ्यायला शिकूया.
तत्वे:
तत्वांचा अंगीकार करतांना ती विचार करून, पारखून, मोजून मापून व व्यवस्थित तोलून घ्यावी कारण आपली तत्वेच कायम आपल्यावर स्वामीत्व गाजवत असतात, हे समजून घ्यायला शिकूया.
सुटका:
“सगळे करत आहेत म्हणून आपणही करतो” असे म्हणणे म्हणजे विचार करणे, निर्णय घेणे, जबाबदारी घेणे व विकास करणे यातून स्वतःची सुटका करून घेणे, हे समजून घ्यायला शिकूया.
जाहिरात:
समाजातील थोड्याफार लोकांचे वाईट वर्तन पेपर, टी. व्ही. व समाज माध्यमे यांमधून इतर बहुसंख्य लोकांच्या लक्षात आणून देणे म्हणजे त्या वर्तनाची जाहिरात करण्यासारखेच आहे, हे समजून घ्यायला शिकूया.
निवड:
अनुकरण की सद्सदविवेक यांपैकी निवड करतांना बहुतांश वेळा आपण इतरांच्या अनुकरणाचीच निवड करतो व स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी गुंडाळून ठेवतो, हे समजून घ्यायला शिकूया.
बलवान:
आपण जे काही करणार आहोत त्या गोष्टीवर आपले नियंत्रण “असणे” ही एक बाब आपल्याला बलवान करते, तर ते “नसणे” आपल्याला हतबल बनवते, हे समजून घ्यायला शिकूया.
अपेक्षा:
आपली आपल्याकडूनच काही अपेक्षा असणे व ती पूर्ण करण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टींवर आपले कसलेही नियंत्रण नसणे, तणावाचे कारण असू शकते, हे समजून घ्यायला शिकूया.