ज्या पातळीवर आपला मानसिक समज व आकलन यांचा स्तर असतो, त्याच पातळीवर आपल्या सुखाचा व मन:शांतीचा स्तर असतो.
Category: Uncategorized
सहज:
अवघड वाटणाऱ्या कामाचे, आपण तोपर्यंत भाग-उपभाग व टप्पे-उपटप्पे करूयात, जोपर्यंत ते करण्यात सहज व सोपे वाटत नाहीत.
संकल्प:
भीतीकडे कानाडोळा करण्याऐवजी, भीतीला जाणून घेऊन, जाणीवपूर्वक व समजून-उमजून केलेले संकल्प, निरंतर, सातत्यपूर्ण व द्रुढ होतात.
पायावर:
दोन जीवनमूल्ये निवडून, त्यांच्या पायावर हरेक निर्णय घेऊन, जीवन सुखी व सम्रुद्ध करणे, म्हणजेच “स्वतःच्या पायावर उभे राहणे”.
चित्रपट:
आपण प्रत्यक्षात जे करतो व बनतो, ते यापूर्वीच अंतर्द्रुष्टीने व अंतर्मनाने, चित्रपटरूपामध्ये खूप वेळा पूर्ण अनुभवलेलं असतं.
स्वतः
स्वतःबद्दल पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं, आपल्याला स्वतःलाच, स्वतःच्याच अंतर्मनात आणि स्वतः शोधल्यावरच सापडू लागतात.
हेतू:
वेळीच जागं व्हावं, सावरावं, सुधारावं आणि विकसित व्हावं याच उदात्त हेतूने, आपल्याला छोट्या छोट्या अडचणी येत राहतात.
स्व:विकास
स्व:विकासाच्या गाडीला दोन चाके आहेत, कामांचं नियोजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात, दोन्ही नीट चालतील अशी तजवीज करूयात.
कर्तव्य:
लग्नाला आपल्याकडे कर्तव्यं म्हणतात हक्क नाही, ज्यांना स्व:हक्कांपेक्षा स्व:कर्तव्यांशीच जास्त देणेघेणे असते, तेच सुखी दांम्पत्य.
अद्रुष्य:
सुखी, समाधानी, सम्रुद्ध व अर्थपूर्ण जीवनाची, जवळजवळ सर्व रहस्ये अद्रुष्य असतात व आपल्याच मनात विराजमान असतात.