आपण आपल्या कुटुंबात शारिरीक व मानसिक आजारांना आग्रहाचे निमंत्रण देत असतो जेंव्हा ‘चूल आणि मूल’ या कामांना आपण कमी लेखतो व ती कामे करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो.
Category: Uncategorized
मध्य:
‘दिलेला शब्द, शपथ किंवा वचन नेहमी पाळलेच पाहिजे’ आणि ‘दिलेला शब्द, शपथ किंवा वचन कधीच पाळायचे नाही’, या दोन्हींचा टोकांचा मध्य साधायला शिकूया.
मोडतोड:
उद्या आपल्या घरात होऊ घातलेली मोडतोड टाळायची असेल तर आज घराबाहेर मोडतोड करणाऱ्या आपल्या व्यक्तीला डोक्यावर घ्यायचे किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचे टाळायला शिकूया.
आसपास:
वारंवार प्रयत्न करणारे आपल्या अपेक्षांच्या व स्वप्नांच्या आसपास पोहोचतात, नशीबावर व इतरांवर विसंबणारे किंवा बघू नंतर म्हणणारे मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, हे समजून घ्यायला शिकूया.
मानवसेवा:
मानवसेवा करण्याचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे आपल्या वाट्याचे काम आपल्या घरचे व महत्वाचे समजून आवडीने, तन्मयतेने व आत्मियतेने करत रहायला शिकणे, हे समजून घ्यायला शिकूया.
करिअर:
जी कामे करताना आपण आपले देहभान, काळवेळ व तहानभूक विसरून जातो, अशी काही कामे असणारे कायदेशीर व्यवसाय किंवा नोकरी, आपले करिअर म्हणून निवडायला शिकूया.
प्रभावी मार्ग:
आपला निरुत्साह, बोरडम व शीण घालवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपली रोजची छोटी छोटी कामे आनंदाने, आवडीने व मनापासून करायला शिकणे.
नुकसान:
कोणा गरजुला काही देऊनही, दान, मदत किंवा उपकार करूनही आपलेच भावनिक व आत्मिक नुकसान होते जेव्हा आपली दिल्याची भावना व अहंकार वाढतो, हे समजून घ्यायला शिकूया.
भाळते:
ज्या गोष्टींवर आपले मन सहजच भाळते, त्या गोष्टीच नंतर आपल्या मनाला भळभळत्या जखमा व वेदना देऊ शकतात, याचे भान ठेवून मनाला थोडा आवर घालायला शिकूया.
सोपे पर्याय:
आपल्यासमोरच्या रोजच्या समस्या व प्रश्न यांना आपली स्वतःची प्रतिष्ठा, इज्जत, किंमत व नाव यांच्याशी जोडण्याऐवजी त्या सोडवताना साधे, सहज, व्यावहारिक व सोपे पर्याय निवडायला शिकूया.