आपण पर्याय नेहमीच चांगले, योग्य, सर्वोत्तम व मूल्याधिष्ठित असेच निवडतो पण त्यासाठी द्यावी लागणारी दृष्य आणि अदृष्य स्वरूपातील यथायोग्य किंमत मोजायला आपण टाळाटाळ करतो.
Category: Uncategorized
किंमत:
कोणत्याही गोष्टीबाबत किंवा वस्तुबाबत आपण तोपर्यंत विरक्तच असतो, जोपर्यंत आपले वैयक्तिक द्रुष्टीकोन, विचार व भावना त्याला काही अर्थ किंवा किंमत मिळवून देत नाहीत.
विश्वातील:
आपल्या विश्वातील विचारांबरोबरच आपल्या विश्वाबाहेरील विचारांचीही नोंद घेऊया आणि तिथेच रेंगाळत न बसता ध्येय व प्राधान्य, क्षमता व कमतरता लक्षात घेऊन पुढे जायला शिकूया.
वापरूया:
चावी मारणाऱ्या, हवा भरणाऱ्या व हरभऱ्यावर चढवणाऱ्या लोकांबरोबर मनसोक्त हसूया, मात्र आपली कल्पकता, ऊर्जा व शक्ती त्यांच्या नाही तर आपल्या कामामध्येच वापरूया.
ठाम:
धडा शिकवीन किंवा इंगा दाखवीन किंवा चाटूगीरी, चमचेगीरी करून खूष करेन यांपेक्षा स्वतःला आनंद देणाऱ्या आपल्या ध्येय व भूमिका यांवर ठाम राहूया.
वैशिष्ट्यपूर्ण:
काल्पनिक मनातल्या जगात, वास्तविक व्यावहारिक जगात व वैविध्यपूर्ण लोकांच्या जगात कोणीही, कितीही व कशीही तुलना केली तरी, आपणासारखे वैशिष्ट्यपूर्ण फक्त आपणच असतो.
तोडगा:
समस्येवर तोडगा काढताना आपल्याबरोबरच इतरांचीही ध्येये, उद्दीष्टे, भावना व प्राधान्ये यांचा बरोबरीने विचार करायला शिकूयात.
नापसंती:
व्यक्तीचा राग आल्यावर मनात रागे भरून त्याच्यावर डूख धरण्यापेक्षा त्याच्या गैर वागणुकीबाबत नापसंती व चीड बोलून व्यक्त करायला शिकूयात.
समाधान:
आपल्या मनाला तात्पुरते समाधान व आनंद देणाऱ्या पर्यायांऐवजी समस्येचे समाधान व निराकरण करणारे पर्याय तयार करायला व निवडायला शिकूया.
पर्याय:
परिस्थितीबद्दल स्वतःवर किंवा इतरांवर दोषारोप करण्याऐवजी तीचा स्वीकार करुन, तिचा सामना करण्यासाठी पर्याय शोधणे हे उद्दिष्ट ठेवायला शिकूया.