नकारात्मक भावना टाळण्यासाठी, लपवण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी केलेल्या क्रुती आपल्याला मुक्त करीत नाहीत तर बांधून ठेवतात, हे समजून घेऊया.
Category: Uncategorized
भावना:
नकारात्मक भावनांच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या खऱ्या, मूळ अंतर्गत भावना व दिखाऊ, शिकाऊ बाह्य भावना ओळखायला शिकूया.
संदर्भ:
नकारात्मक भावनांची योग्यअयोग्यता आणि अनुरूपता तपासून बघण्याचा व त्या भावनांना योग्य प्रतिसाद देण्याचा संदर्भ म्हणजे आपण ठरवलेली स्पष्ट व नेमकी उद्दिष्टये.
भर:
आपल्या “मरणाच्या घटकेवर” नियंत्रण करण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा आपले “जगणे अर्थपूर्ण करण्याचा” खटाटोप करण्यावर भर द्यायला शिकूया.
विचार:
आपले विचार हे उर्जेचे रूप आहेत, ते अक्षय आहेत, ते नष्ट करता येत नाहीत, परंतु त्यांना दुसऱ्या विचारांमध्ये तत्क्षणी बदलता येते, हे सत्य समजुन घेऊया.
लक्ष:
आयुष्यात आपल्याला काय हवंय? काय आवडतंय? याचबरोबर आयुष्यात आपल्याला काय महत्त्वाचं आहे? त्याकडेही लक्ष द्यायला शिकूया.
लक्षणे:
आपल्याला जाणवणारी त्रासिक शारिरीक लक्षणे ही गंभीर आजारांची लक्षणे नसून केवळ मानसिक ताणतणाव व त्याच्या विविध प्रतिक्रिया असू शकतात.
नाते:
आपल्याला आपले रोजचे टेंन्शनचे विचार खुल्लमखुल्ला व मोकळेपणाने बोलता येतील असे नाते शोधूया व त्या नात्याची नित्य मशागत करूयात.
भावनावश:
आपण अगोदरच भावनावश व भावनाविवश असेल तर समोरच्या व्यक्तीच्या वेगळ्या भावनांशी समरस होऊन त्याला समजून घेणे अवघड होते, हे लक्षात ठेवूया.
सारखेच:
इतरांच्या क्रुतीमध्ये स्वतःला शोधल्यास व स्वतःच्या क्रुतीमध्ये इतरांना शोधल्यास समजते, की आपण ‘सारेजण सारखेच’ आहोत.