कोणा एकाला त्याग करण्याची गरज नसणे, दुसऱ्याला जिंकण्याची आशा नसणे, दोघांनीही तडजोड व समेट करणे म्हणजेच सहकार भावना, ती जोपासायला शिकूया.
Category: Uncategorized
मत:
इतरांचे “मत ऐकून व समजून घेतले” तरीही आपण मित्रत्वाने त्या “मताशी असहमत रहायला” व तसे “नम्रपणे बोलून दाखवायला” शिकूयात.
महत्वाच्या:

बदलायला:
“इतरांनी बदलायला हवं” असं वाटत असेल तेव्हा आपण “इतरांना समजून घ्यायला” शिकायला हवं, आणि आपण “स्वतःला बदलायला शिकायला हवं”.
काय आहे?:
आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडे व नातलागांकडे “काय नाही?” हे पाहण्यापेक्षा “काय आहे?” हे पहायला, मोजायला व बोलायला शिकूयात.
प्रेम:
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला जपणे, त्याच्या मताला जपणे, त्याच्या मनाला जपणे, त्याला अतिशय उच्च दर्जाची वागणूक देणे म्हणजे त्या व्यक्तीवर प्रेम करणे.
समजून घेणे:
दुसऱ्याला समजून घेणे म्हणजे त्याच्या भावनांचे समर्थन करणे व स्वीकार करणे तसेच मतभेद व्यक्त करणेस परवानगी देणे व त्या मतभेदाचाही स्वीकार व आदर करणे.
व्यक्त:
नकारात्मक भावना बोलून व्यक्त करण्याऐवजी, त्या पत्रामध्ये किंवा वहीमध्ये लिहून काढणे व त्यातील निष्ठूरतेची नोंद घेणे, श्रेयस्कर.
स्मितहास्य:
आपल्या घरातील व ऑफिसमधील व्यक्तींना ग्रुहित न धरता कधीही कोठेही भेटल्यावर स्मितहास्य करून त्यांना मान व आदर द्यायला सुरुवात करुया.
भान:
आपल्या द्रुष्टीकोनातून क्षुल्लक व फालतू असणाऱ्या गोष्टी, इतरांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या असू शकतात, याचे सदैव भान ठेवूया.