विचारशून्य क्रुती नको, क्रुतीशून्य विचार नको, तर विचार व क्रुती यांचा हरघडी समतोल साधायला शिकूया.
Category: Uncategorized
विश्वास:
इतरांनी आपल्यावर विश्वास टाकावा असे वाटण्यासाठी आधी आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे.
बरोबर:
निर्णय घेताना आपण जे करतोय ते बरोबर नसले तरी; त्यामुळे बरोबर काय आहे व आपण काय करायला हवे? ते आपल्याला समजते.
जाणीव:
नकारात्मक भावनांची जाणीव झाल्यामुळे आपल्याला फायदाच होतो, आपल्याला आपल्या मनाचा तोल सावरायला मदत होते.
द्रुष्टीकोन:
“जर तुम्हाला मी आवडत नसेल तर मलासुद्धा तुम्ही आवडत नाही,” हा द्रुष्टीकोन आपल्याच स्वतःच्या विकासाला खिळ घालत असतो.
इच्छा:
आपली जर खरोखर काही करण्याची इच्छा असेल तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा व बोलण्याचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही.
याचक:
“सौजन्याने मागीतली तरच मदत देणार,” असे म्हणताना; आपण मदत देणारे न होता, मागणी करणारे म्हणजे सौजन्याचे याचक होत असतो.
प्रेम:
एखाद्या व्यक्तीला खुश ठेवणे, तिला हवे तसेच वागणे, काहीच न करणे, वाईट गुण शोधणे, वाईट चिंतणे कशाचाही अर्थ प्रेम होत नाही.
बचाव:
आपल्या चुकीबद्दल आपण “मला माहीत नव्हते” म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करून, आत्मविकासाची संधी वाया घालवतो.
एकरूप:
आपले वागणे व द्रुष्टीकोन यांमध्ये दुरूस्ती करायची असेल तर; आपल्याला खेद, दुःख व पश्चात्ताप या भावनांशी एकरूप व्हायला हवे.