जगासाठी यशस्वी असूनही आपण स्वतःला अयशस्वी समजतो, जेव्हा भीतीतून निर्माण होणारी ऊर्जा आपल्याला यशाकडे ढकलते.
Category: Uncategorized
अर्थाशिवाय:
अपयशाला व अस्वीक्रुतीला घाबरून पळणे कींवा यशाच्या व स्वीक्रुतीच्या आशेने साध्याकडे पळणे, अर्थाशिवाय दोन्हीही निरर्थक.
भावी स्वप्नांना:
तीच तीच कामे करून तोचतोचपणा आला असेल तर, आता आपल्या भावी स्वप्नांना काही वेळ देणे आवश्यक व गरजेचे आहे.
साहस:
स्वतःबाबतचा निर्णय स्वतः घेणे, त्यावर विश्वास ठेवणे, त्यासाठी एकटे उभे रहाणे व त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे म्हणजे साहस.
मार्ग बंद:
“मी असाच आहे, मी असाच राहणार” असे म्हणणे म्हणजे, आपल्याला जे बनणे गरजेचे आहे ते बनण्याचा मार्ग बंद करणे.
आवडी व गरजा:
आपल्या आवडी व गरजा हेच जर आपल्यासाठी सर्वकाही असतील तर, लवकरच त्यांचे राज्य आपल्यावर स्थापित होते व स्वातंत्र्य संपते.
ताणतणाव:
जीवनात असंतुलन असल्याचे जे संकेत आपल्याला आपले शरीर व मन यांमार्फत मिळतात, त्यांना आपण ताणतणाव म्हणतो.
संतुलित वाटप:
जीवनातील सौंदर्य, सामंजस्य व संतुलन मिळवण्यासाठी; योजना, ऊर्जा, वेळ, पैसा यांचे महत्वाच्या क्षेत्रांमध्ये, संतुलित वाटप करुयात.
संतुलन:
इतरांच्या व परिस्थितीच्या मागण्या किंवा अपेक्षा, जेव्हा आपल्यावर स्वार होऊ लागतात तेव्हा, आपण पुन्हा संतुलन साधायला हवे.
संतुलन:
आपण जर अगोदर स्वतःबरोबर संतुलन साधू शकत असू तर, इतरांबरोबर व परिस्थितीबरोबर संतुलन साधणे, सहजपणे शक्य आहे.