स्वस्थ जीवनमूल्यांच्या चौकटीनुसार, आपले असंतुलित जीवन संतुलित करणे व त्यानुसार ध्येये संचलित करणे, म्हणजे जीवनसंतुलन.
Category: Uncategorized
हमखास अपयश:
बाह्य जगातील भौतिक गोष्टी व वस्तू प्राप्त करणे, हेच जीवनमूल्य व अंतिम स्वप्न किंवा ध्येय असणे, म्हणजे पदरी हमखास अपयश.
ठेच:
आपल्या अंतर्मनाला ठेच पोहोचवणाऱ्या किंवा आत्म्याला गमावणाऱ्या गोष्टी शोधून, त्या पक्क्या लक्षात ठेवायला शिकूया.
टप्याटप्याने निवड:
आपल्या भीतीवर विजय मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे आत्मविश्वासाने आपल्या क्रुतींची टप्याटप्याने निवड करायला शिकणे.
छान चाललंय:
आपलं “आहे ते चांगलं व छान चाललंय” असं वाटणं म्हणजे, आपण अधिक चांगलं व उदात्त ध्येय शोधायला व निवडायला हवं.
अनुकूल:
लोक, परिस्थिती, नोकरी, परिसर अशा उद्दीपकांमुळे प्रभावित होताना, आपण आपल्या स्वप्नांना अनुकूल अशाच प्रतिक्रिया निवडूयात.
प्रेरित:
आपल्या ध्येयांनी व स्वप्नांनी इतरांना नाही केले तरी, आपल्याला स्वतःला प्रेरित, मोहीत व उत्साहीत नक्कीच करावे.
पाया:
आपली जीवन जगण्याची मूल्ये कोणती? ते शोधून, त्यांचा वापर आपल्या ध्येयांचा पाया म्हणून करणे गरजेचे आहे.
शक्ती व स्वप्ने:
आपल्या सर्वात मोठ्या शक्ती शोधून काढणे आवश्यक आहे कारण त्यावरच आपण आपली भावी स्वप्ने उभी करणार असतो.
उगमस्थान:
आपल्याला रडवणाऱ्या किंवा हताश करणाऱ्या समस्या किंवा गरजा आपल्या स्वप्नांचा व ध्येयांचा उगमस्थान ठरू शकतात.