जीवनातील आव्हानांशी लढताना, मी कसा बरोबर आहे? हे पटवून देताना, आपल्या मनात प्रेमळपणा जपण्याची काळजी घ्यायला शिकूया.
Category: Uncategorized
नकारात्मक भावना:
आपल्या अतिशय जवळच्या व प्रिय व्यक्तीच्या नकारात्मक भावना, वस्तुनिष्ठपणे स्वीकारणे व वैयक्तिक प्रतिक्रिया न देणे, अवघड असते, पण शिकूयात.
संवाद:
नात्यागोत्यातील वादविवाद टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे प्रेमळ, सामंजस्यमय व आदरयुक्त संवाद साधायला शिकणे.
व्यक्त:
वाद न घालता, न भांडता व प्रामाणिक राहून स्वतःच्या नकारात्मक भावना व्यक्त करायला शिकणे, निकोप नात्यासाठी गरजेचे आहे.
शक्य:
वजन वाढवणे, स्नायू बळकट करणे व सिक्स पॅक बनवणे फक्त शरीरासाठी नव्हे, तर मेंदूसाठीही शक्य आहे आणि खूप गरजेचे आहे.
सुधारण्याचा राजमार्ग:
रागावणे, नियंत्रण करणे व उपदेश देणे याऐवजी समजून घेणे, स्वीकार करणे व विश्वास ठेवणे हा वर्तन सुधारण्याचा राजमार्ग ठरतो.
त्याग:
इतरांनी आपल्यासाठी त्याग करावा, या अपेक्षेने आपण त्याग करणे, म्हणजे हमखास येणाऱ्या विफलतेकडे मार्गक्रमण करणे.
गरजा:
आपण आपल्या गरजांवरूनच इतरांच्या गरजा ठरवतो, व त्यांच्या नसणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो.
आपल्यासारख्याच:
दुसऱ्यांच्या इच्छा-आकांक्षा व गरजा, अगदी आपल्यासारख्याच असतात असे समजणे, हा सुदृढ नात्यातील सर्वात मोठा अडसर आहे.
संतुलन:
काहीजण आधी ठरवतात मग बोलतात, तर काहीजण आधी बोलतात मग ठरवतात, दोन्ही टोके सोडून देऊन संतुलन साधूया.