आपल्यासमोरील अनेक अडचणींपैकी ज्या व जशा अडचणी आपण सोडवायला निवडतो, तशाप्रकारे आपण स्वतःला घडवत असतो.
Category: Uncategorized
मौल्यवान:
आपल्याला मिळालेली बुद्धिमत्ता व नैसर्गिक गुणवत्ता यांकडे आपण जेवढे जास्त लक्ष देऊ व रूची घेऊ, तेवढे आपण जास्त मौल्यवान होऊ.
अन्याय:
इतर कोणाच्या तरी दबदब्याने व दिव्यत्वाने भारून जाऊन त्यांची नक्कल करणे, म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर व स्वत्वावर अन्याय करणे.
नक्कल:
वाट्टेल ते करण्याची परवानगी मिळाल्यावर, आपण कोणाची नक्कल तर करत नाही ना? याची खात्री करून घेऊन, ते न केलेले बरे.
उत्कृष्टतेचे ध्येय:
परिपूर्णतेचे ध्येय विफलता आणणारे असते, त्याऐवजी चालना व बक्षीस देणारे उत्कृष्टतेचे ध्येय ठेवायला शिकूया.
यश:
आपण जे उद्दिष्ट ठेवतो ते मिळवणे म्हणजे यश नाही, तर आपण जे मिळवायला हवे त्याचे उद्दिष्ट ठेवणे म्हणजे यश.
शिकायचे:
आपल्या चुकांमधून जर आपल्याला काही शिकायचे असेल, तर चुका नाकारणे व चुकांचे समर्थन करणे, आपण थांबवायला हवे.
अपयशी:
आपल्या चुकांबद्दल किंवा अपयशाबद्दल सबबी देण्यास किंवा इतरांना दोष देण्यास सुरुवात करणे, म्हणजे खरोखरच अपयशी होणे.
युद्धे:
आपल्याला लढावयाची सर्वांत मोठी व महत्वाची युद्धे, आपल्याच अंतर्मनातील युद्धभूमीवर किंवा रंगमंचावर चालू असतात.
भीती:
आपल्याला वाटणाऱ्या जवळपास सर्व भीती या आपल्या अंतर्मनात व अंतर्गत जगात असतात, बाह्यजगात कुठेही त्या अस्तित्वात नसतात.