जेव्हा आपण त्रासलेले व विचलित होतो, तेव्हा समोरचे द्रुष्य किंवा परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची जास्त गरज असते.
Category: Uncategorized
स्वतःला जिंकणे:
आपण स्वतःला जितका त्रास देऊ शकतो, तितका इतर कोणीही देऊ शकत नाही, म्हणून स्वतःला जिंकणे हा सर्वोत्तम विजय आहे.
क्रुतज्ञ:
आपल्या जीवनात अडथळे, अडचणी, समस्या व आव्हाने असतील तर क्रुतज्ञ होऊया; संयम, व्यक्तीमत्व व चारित्र्य विकसित करून घेऊया.
स्वातंत्र्य व धाडस:
आपले हितकारक पर्याय निवड करू शकण्याचे स्वातंत्र्य व योग्य निर्णय घेऊ शकण्याचे धाडस, ही आपल्या उज्वल भविष्याची नांदी आहे.
संयुक्त परिणाम:
आज आपण जे काही आहोत, ते काल आपल्याकडून काही निर्णय घेण्याचा आणि काही निर्णय न घेण्याचा, संयुक्त परिणाम आहे.
विसंबून:
आपण ज्या गोष्टींवर विसंबून राहतो, त्यांच्या हवाली होऊन जातो, म्हणून आपल्या स्वप्नांवर व ध्येयांवर विसंबून रहायला शिकूया.
अभाव:
आपण अयशस्वी होण्याचे प्रमुख कारण बुद्धिचा अभाव हे नसून, आपल्याकडे असणारा ध्येयांचा व उद्दिष्टांचा अभाव हे आहे.
आदर्श:
स्वतःबाबत जर आपण समाधानी असू, तर खूप छान! आता स्वतःला आदर्श बनवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात.
वेळ:
आपण आपल्यासाठी जे ठरवले, ते सर्व मिळवले असेल तर, आता पुन्हा आपल्या जीवनाचे नियोजन करण्याची हीच वेळ आहे.
बदलण्यासाठी:
आपले जीवन बदलण्यासाठी, आपण आपले जीवनाबद्दलचे द्रुष्टीकोन शोधून काढूयात व ते बदलण्याचा जीवापाड प्रयत्न करूयात.