आपण ‘नेहमी शहाण्यासारखे व विवेकाने वागलेच पाहिजे,’ हा अविवेकी विचार आपल्याला भावनिक अस्वास्थ्य देऊ शकतो.
Category: Uncategorized
विवेकी:
जे विचार, आपली दिर्घकालीन उद्दिष्टे व ध्येये साध्य करण्याच्या मार्गात, आपल्याला सहाय्यक ठरतील, ते विवेकी समजूया.
सूज्ञपणा:
झुकतं माप कोणाच्या पदरात द्यावं? बुद्धीच्या की मनाच्या व ह्रदयाच्या, विचारांच्या की भावभावनांच्या हे ठरवता येणं म्हणजे सूज्ञपणा.
आकांडतांडव:
आपल्या असुविधा व समस्या यांबद्दल आकांडतांडव केल्यामुळे त्या अधिकाधिक तीव्र स्वरूप धारण करतात.
अटी व शर्ती:
आपले आयुष्य त्रासदायक, दुःखी व कटकटींचे करणे, म्हणजे आपल्या जीवनाला व जगण्याला अटी व शर्ती लागू करणे.
बिनशर्त:
आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे स्वतःचा बऱ्या-वाईट गुण व वर्तनांसकट बिनशर्त स्वीकार करणे.
गुणविशेष:
आपण चांगली किंवा वाईट व्यक्ती नाही आहोत, तर काही चांगले व काही वाईट गुणविशेष असणारी एक व्यक्ती आहोत.
दर्जा:
आपला “दर्जा” व आपली “लायकी” यांचा विचार करून जगताना, आपण छोट्या-छोट्या उत्स्फूर्त आनंदांकडे पाठ फिरवत असतो.
मिश्रण:
आपण प्रमादशील व स्खलनशील असतो, आपण संपूर्णतः चांगले किंवा संपूर्णतः वाईट कधीही नसतो, त्यांचे मिश्रण असतो.
तुरुंग:
आपल्यामधील हेवा, मत्सर, अपराधीपणा, आत्मकरुणा व चिंता हे विकार म्हणजे आपले मनोनिर्मित तुरुंगच असतात.