स्वतःवर “चांगला माणूस” हा शिक्का मारल्यास, आपले लक्ष समस्येवरून व संधींवरून विचलित होते व चांगले असण्यावर स्थिर होते.
Category: Uncategorized
मूल्यांकन:
आपल्या व इतरांच्या वर्तनाचे किंवा कार्याचे मूल्यांकन करायला व संपूर्ण व्यक्तीमत्वाचे मूल्यांकन करणे टाळायला शिकूया.
बकरा:
आपल्या स्वार्थत्यागाच्या बदल्यात, इतरही नंतर तसाच स्वार्थत्याग करतील, असे मानणे म्हणजे “बळीचा बकरा” बनणे होय.
मूल्यवान व लायक:
“आपण अस्तित्वात आहोत” हीच आपल्याला “मूल्यवान व लायक” बनवणारी जगातील एकमेव गोष्ट असू शकेल.
प्रामाणिकपणा:
इतरांना अपाय होईल असे वर्तन टाळून, स्वतःशी सह्रदयतेने व प्रेमाने वागणे व स्वहिताचे रक्षण करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
बिघडत:
आपण सुखसुविधा व यंत्रसामग्री यांमुळे बिघडत नाही, तर त्यांबाबतीत असणाऱ्या, आपल्या अविवेकी व अवास्तव द्रुष्टीकोनांमुळे.
स्वरूप:
एखाद्या विचारसरणीने आपल्या कामात व कर्तव्यात अडथळा आणू नये यासाठी, तीचे स्वरूप विवेकी व वास्तववादी ठेऊया.
मूल्यमापन:
मूल्यमापन करावयाचे असेल तर आपल्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या वागणूकीचे करूयात, संपूर्ण व्यक्तीमत्वाचे नको.
मानसिक अस्वस्थता:
कोणत्याही द्रुष्टीकोनाकडे किंवा मताकडे पाहण्याचा आपला द्रुष्टीकोन कट्टर, हटवादी व ताठर असणे म्हणजे मानसिक अस्वस्थता.
व्यक्ती:
आपली मानसिक अस्वस्थता निर्माण करणारी, वाढवणारी अथवा टिकवून ठेवणारी एक व्यक्ती म्हणजे आपण स्वतः.