आपलं वाटणं हे वाटणंच असतंय, संपूर्ण सत्य नसतंय, तरीही आपल्या प्रतिक्रिया व भावना या वाटण्यावरूनच संचलित होतात.
Category: Uncategorized
पर्याय
आपली भावनिक अस्वस्थता दूर करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे आपले दृष्टिकोण बदलून ते विवेकी, वास्तववादी व तर्कनिष्ठ बनवणे होय.
जबाबदार:
आपल्या मानसिक अस्वस्थतेला, जर कोणा एका व्यक्तीला जास्तीत जास्त जबाबदार ठरवायचे असेल, तर ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः.
शिक्के:
आपण इतरांच्या कपाळावर व व्यक्तीमत्वावर मारलेले चांगले वाईट शिक्के, आपल्या मात्र मनावर कोरले जातात, याचे भान ठेवूया.
आभासी:
आपल्या विचारांना विवेकभ्रष्ट व तर्कदुष्ट करणाऱ्या, भावनिक व वादळी घटना बऱ्याच वेळा काल्पनिक व आभासी असतात.
स्वास्थ्य:
आपले भावनिक स्वास्थ्य चांगल्या-वाईट घटनांमुळे नव्हे; तर त्यांकडे पाहण्याच्या आपल्या द्रुष्टीकोनांमुळे ठरते.
ताकद:
आपल्या निसर्गदत्त बुध्दीला निस्तेज, लुळं पांगळं किंवा नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याच भावनिक अस्वास्थ्यामध्ये आहे.
गरजेचे:
आपल्याला ज्या प्रकारचं व प्रतीचं जीवन जगायचं आहे, त्याच प्रकारचे व प्रतीचे द्रुष्टीकोन, विचार, वाक्यप्रचार व स्वगत गरजेचे आहेत.
अर्थ:
आपल्या जगाला व जगण्याला आलेला अर्थ, म्हणजे आपला स्वतःकडे, इतरांकडे व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन.
भाषण:
हरेक प्रसंगात आपण स्वतःशी केलेले भाषण व स्वतःला बोललेली वाक्ये आपली त्या क्षणातील भावना व मनःस्थिती ठरवतात.